
*अन् तिघी मायलेकी बचावल्या ; मोठा अनर्थ टळला*
*अहिल्यानगर*
शहरातील भरोसा सेल परिसरात नागरिकांना बसण्यासाठी बनविण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडवर अचानक मोठे झाड पडल्याने पत्र्याचे शेड जमीनदोस्त झाले. त्या शेडमध्ये बसलेल्या दोन महिलांसह एक लहान मुलगा थोडक्यात बचावला. त्यांना तत्काळ शेडमधून बाहेर काढण्यात आले. ही घटना गुरुवार (ता. ९) रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
*पत्र्याचे शेड जमीनदोस्त*
ऐरवी या पत्र्याच्या शेडमध्ये अनेक महिलांसह नागरिक येथे बसलेले असतात. तसेच सध्या सुरु असलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी जळगावहून आलेले खेळाडू या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री जेवणासाठी बसतात. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा भरातून कौटुंबिक तक्रारी देण्यासाठी अनेक महिलांसह नागरिक भरोसा सेल येथे येतात. त्यांना बसण्यासाठी पत्र्याचे शेड बनविण्यात आले होते.आहे. मात्र,त्या शेडवर झाड पडल्याने शेड जमीनदोस्त झाले आहे.
*नवनवीन अपडेट रोज जाणून घेण्यासाठी आमचा चैनल ला लाईक/फॉलो/सबक्राईब करा*
https://chat.whatsapp.com/CYgU6AhPRN333V8JxJnaB5
*=====================*
https://www.instagram.com/news_ahilyanagar24?igsh=aHE0bGd2ZXh5YThk&utm_source=qr
*=====================*
https://youtube.com/@newsahilyanagar24?si=2nGSiMIUUiZQ-eyu
*=====================*
https://facebook.com/61571075052622
*=====================*
*7083625623*