
गो हत्या करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी अहिल्यानगर युवासेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट यांचे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !
https://newsahilyanagar24.blogspot.com/2025/01/blog-post_73.html
शिवसेना नगर दक्षिण चे युवासेना प्रमुख श्री साईनाथ आधाट काल दि.०.७/०१/२०२५ रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुखमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुंबई येथे भेट घेऊन; गो हत्या करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले.सध्या महाराष्ट्र मध्ये गो हत्या कयदा लागू आहे परंतू गोवंशाची तस्करी व हत्या राजरोज सुरूच आहे;याचे कारण म्हणजे कठोर शिक्षा होत नाही.
निवेदनात काय म्हटले ?
आपण आपल्या कार्यकाळामध्ये गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलेला असून त्यामुळे गोमातेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले असून, तरीही आज रोजी मोठ्या प्रमाणात गो तस्करी वाढलेली असून व त्या माध्यमातून मांस विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जात असून सदर कृत्यांमध्ये अनेक गुन्हेगार समाविष्ट असून सदर गुन्हेगार हे गुंडगिरी करत असून, त्याच्या जोरावर मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे, त्यामुळे सदर गुन्हेगारांवर वचक बसण्या करिता कठोर कारवाई करून जास्तीत जास्त कडक शिक्षा चा कायदा अमलात आणावा जेणेकरून हत्या होणार नाहीत व याला आळा बसेल या माध्यमातून हिंदू धर्मांच्या भावना दुखावणार नाहीत व कायदा सुवेव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, त्यामुळे विनंतीवरून निवेदन करतो की गोहत्या करणाऱ्यावर कठोर शिक्षेच्या कायदयाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी.
निवेदन देते वेळी अहिल्यानगर नगर जिल्हा प्रमुख श्री.अनिल शेठ शिंदे,जिल्हा प्रमुख सचिनजी जाधव,शेवगांव तालुका प्रमुख अशितोष जी डहाळे व अहिल्यानगर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.