नगर, नाशिक मध्ये दुचाकी चोरणारा जेरबंद.
अहिल्यानगर अपडेट
👮♂️अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात दुचाकी चोरणारा संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी असा एकूण ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत आरोपीस पुढील तपासाकामी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
👉सापळा रचून आरोपी ताब्यात
अन्वर मन्सूर शेख, (वय ४२, रा.पानमळा, चांदेकसारे, ता.कोपरगाव, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी गुन्ह्यातील संशयित आरोपी शेख हा सावळीविहीर येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतला. त्याने नाशिक जिल्ह्यातून तीन व शिर्डी परिसरातून तीन अशा ६ दुचाक्या हस्तगत केल्या.