logo

वर्धा :- सेलू बोर कॅनल मद्धे तरुणाचा मृतदेह आढळला......

वर्धा :-सेलू. गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या हिंगणीच्या तरुणाचा मृतदेह शिवणगांव शिवारात आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे, मृतकाचे नाव महेश उर्फ राहुल नामदेवराव वाटगुळे (34)रा. हिंगणी. बुधवारी दुपारी त्याचा मृतदेह गावाकऱ्यांना शिवणगांव शिवारातील कॅनल च्या कचऱ्यात मिळून आला. हिंगणी येथील मृतक महेश वाटगुळे हा गेल्या शनिवार पासून बेपत्ता होता, गोहदा शिवारात त्याने मक्त्याने शेती केली असून तो शेतात गेल्याचा समज घरच्यांना झाला होता, त्यामुळे महेश चा शोध घेण्याचा प्रयन्त केला, परंतु महेश काही सापडला नाही, शेवटी बुधवारी शिवणगांव येथील ग्रामसतांना वास येत असल्याने ग्रामसतांनी त्या दिशेने घेतला असता कॅनल च्या कचाऱ्यांमद्धे त्यांना पोत्यात भरून काहीतरी असल्याचा संशय आला, तेव्हा पोत्याची पाहणी केली असता त्यात एक मृतदेह फुगलेल्या अवस्तेत आढळाला, त्याच्या हातावर महेश असे नाव गोंधून व त्याच्या खिश्यात आढळलेल्या आधार कार्ड वरून तो हिंगणी येथील पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या महेश असल्याचे निस्पन्न झाले, सदर घटनेची माहिती त्यांच्या परिवाराच्या सदस्यांना देण्यात आली, यावेळी महेशचा घातपात झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे, कारण मृतकाच्या चेहऱ्यावर ओरबडल्याच्या खुणा आढळून आल्या आहे, याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्तळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे....

46
5809 views