
कवडदरा विद्यालयाचे तालुका विज्ञान प्रदर्शनात यश
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील टाके घोटी येथील
पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूल टाके घोटी येथे झालेल्या 48 वे इगतपुरी तालुका विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेञदिपक यश मिळवले आहे.
दिव्यांग गट 9 ते 12 वर्षे वयोगटात
प्रथम क्रमांक वाकचौरे पुष्पा रघुनाथ 11 वी विज्ञान हिने बनवलेल्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. व 6 ते 8 गटात
श्रेयस श्रीराम लोहार व श्रावणी सुनील देशमुख इयत्ता सहावी यांनी बनवलेल्या उपकरणाला व्दितीय क्रमांक मिळवला आहे.तसेच शिक्षक गटातून शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक गट तृतीय क्रमांक श्री प्रमोद परदेशी यांना मिळाला.यांना विद्यालयातील श्रीराम लोहार व प्रमोद परदेशी यांचे मार्गदर्शन मिळाले.
दोन्ही उपकरणांची जिल्हा पातळीवर निवड झाल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजेंद्र नलगे साहेब, सचिव प्रकाश जाधव साहेब तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यालयातर्फे प्राचार्य व्हि.एम.कांबळे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.तसेच समस्त कवडदरा व परिसरातील नागरिकांकडून हार्दिक अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.