"पैश्याचा पाऊस पाडुन देतो सांगुन ३६ लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदु बाबा वर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल"
व्हिजन
सातारा (म्हसवड, प्रतिनिधी): "पैशाचा पाऊस पाडून पैसे २० पट वाढवून देतो" असे सांगून ३६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबां विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी मंगेश भागवत, रा. कळस, ता. इंदापूर, जि. पुणे आणि त्याचा साथीदार सर्जेराव वाघमारे, रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कांता वामन बनसोडे, रा. देवापुर ता. माण जि. सातारा, हरिभाऊ रामचंद्र काटकर, रा. नरवणे ता. माण जि. सातारा, काशिनाथ पावरा रा. माळेगांव ता. बारामती, सुनिल धोत्रे, रा. माळेगांव ता. बारामती यांना आरोपी सर्जेराव वाघमारे, रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याने मंगेश भागवत रा. कळस ता. इंदापुर जि. पुणे हे मायाक्का देवीचे पुजारी असुन ते दैवी शक्तीचे व जादु टोण्याचा वापर करुन पैशाचा पाऊस पाडुन आपलेकडील रक्कम 20 पट करुन देतात असे सांगितले. त्यावेळी त्यांनी नकार दिला म्हणून सर्जेराव वाघमारे, रा. म्हसवड ता. माण जि. सातारा याने मंगेश भागवत यांस म्हसवड येथे बोलावून घेवून त्यांची कांता बनसोडे व त्यांचे इतर सहकारी यांचे सोबत भेट करुन दिली. त्यावेळी मंगेश भागवत याने त्यांना तुम्ही पैसे द्या तुम्हांला मी पैश्याचा पाऊस पाडुन दाखवतो व त्यानंतर तुम्ही पैसे द्या असे सांगितले. व मंगेश भागवत रा. कळस ता. इंदापुर जि. पुणे यांनी तुम्हांला पैश्याचा पाऊस कसा पडतो हे दाखवतो म्हणून मंगेश भागवत यांचे घरी घरामध्ये असलेल्या रुमध्ये हळदीकुंकाचे गोल रिंगण करुन त्यामध्ये काळ्या कपड्याचे बाहुल्या व पिना टोचलेले लिंबु ठेवून त्यांना रिंगणात बसण्यास सांगितले व त्यांचे डोळ्यास पट्टी बांधुन मंगेश भागवत व सर्जेराव वाघमारे यांनी मंत्र म्हणून पट्टी सोडण्यास सांगितले त्यावेळी सदर रुममध्ये हळदीकुंकाचे गोल रिंगणामध्ये 500 रुपये भारतीय चलनाचे नोटाचे बंडलाचा ढीग दिसला त्यावेळी खरोखरच पैश्याचा पाऊस पडतात यावर विश्वास बसला त्यावेळी पैश्याचा पाऊस पाडुन देतील असा विश्वास संपादन करुन संगनमताने त्यांची फसवणुक करुन आम्हांला पुजेचे साहित्यसाठी 36 लाख रुपये द्या असे सांगुन सर्वांकडुन 36 लाख रुपये रक्कम घेवून दिनांक 11/02/2024 रोजी मंगेश भागवत यांचे राहते घरी पैश्याचा पाऊस पडणार आहे सांगुन त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये बांधलेले 6 बॉक्स त्यावरती लिंबु बांधलेले 6 बॉक्स घेवून कांता बनसोडे यांना देवून 6 वॉक्सवरती हळदीकुंकू टाकुन त्यामध्ये 36 कोटी रुपये असल्याचे सांगुन बरोबर 21 दिवसानंतर अभिषेक घालून बॉक्स उघडल्यास घरात पैश्याचा पाऊस पडतो असे सांगितले 21 दिवसानंतर अभिषेक करुन बॉक्स उघडला असता बॉक्समध्ये वर्तमानपत्राची रद्दी असल्याचे दिसले व फसवणुक झाल्याचे दिसले.
सदरचे प्रकाराबाबत कांता वामन बनसोडे, रा. देवापुर ता. माण जि. सातारा, यांनी दिले फिर्यादीवरुन म्हसवड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.0005/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 316(2), 3(5) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समळु उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यांचा तपासाा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सोो, सातारा मा., श्रीमती. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सोो, सातारा व मा. श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, दहिवडी विभाग, दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. सोनवणे, पोलीस निरीक्षक, वडुज पोलीस ठाणे व मा. श्री. बिराजदार सहा. पोलीस निरीक्षक, म्हसवड पोलीस ठाणे हे करत आहेत.