logo

HORTSAP अंतर्गत सिंधुदुर्ग, मालवण, गोळवण येथे काजू शेतीशाळा.

आज मंगळवार दि. ०७/०१/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता गोळवण - सावरवाडी येथे श्री. सत्यविजय साबाजी पालव यांच्या काजू फळबागेमध्ये Horticulture Pest Surveillance and Advisory Project (HORTSAP) अंतर्गत काजू शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात तालुका कृषी अधिकारी श्री. ई. ल. गुरव साहेब यांच्या हस्ते काजू रोपाचे पूजन करून तसेच त्याची लागवड करून करण्यात आले.या काजू शेतीशाळा कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण साहेब तसेच कृषि पर्यवेक्षक श्री. डी. के. सावंत साहेबांच मार्गदर्शन लाभले. तालुका कृषि अधिकारी श्री. गुरव साहेब यांनी काजू मोहर संरक्षणा बद्दल शेतकऱ्यांना काजू फळबागे मध्ये विस्तृतरित्या मार्गदर्शन केले . या सर्व कार्यक्रमाबद्दल आपले बहुमोल असे मनोगत सन्मा. सरपंच श्री. लाड साहेब यांनी मांडले.सदरील कार्यक्रमास गोळवण- कुमामे - डिकवल गावचे मा. सरपंच श्री. सुभाष लाड साहेब , उपसरपंच श्री.शरद मांजरेकर साहेब , ग्रामपंचायत सदस्या श्रीम. चिरमुले मॅडम , ग्रामपंचायत सदस्य गावडे साहेब , ग्रामसेविका श्रीम. शेलटकर मॅडम तसेच गावातील सर्व मान्यवरांची व शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली.

22
6593 views