logo

पोलन पेठेतील तीन दुकाने फोडली....

जळगाव : एकाच रात्री शहरातील
पोलन पेठेतील किराणा, तेल विक्रीच्या दुकानासह सलूनच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी हातसफाई केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी ३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलन पेठेतील नरेश सोनी यांचे पॉप्युलर ट्रेडर्स नावाने तेल विक्रीचे दुकान, तसेच योगेश प्रोव्हिजन व तिरुपती हेअर आर्ट या दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडले. चोरट्यांनी कॅश काऊंटरच्या ड्रॉवरमधून हजार रुपयांची चिल्लर चोरून नेली.


• चोरट्यांनी दुकानातील कॅश काऊंटरच्या ड्रॉवरमधून हजार रुपयांची चिल्लर पैसे चोरुन नेले. चोरट्यांनी सोनी यांच्या दुकानात चोरी केल्यानंतर त्यांनी लागलीच त्यांच्या दुकानाशेजारी योगेश रामप्रसाद अग्रवाल यांच्या दुकानात चोरी केली.

• याठिकाणाहून चोरट्यांनी शंभर रुपयांची चिल्लर तर मिलींद अंबादास अटवाल यांच्या सलूनच्या दुकानातून त्यांनी लाईटबिलसाठी ठेवलेली ३ हजारांची रोकड चोरुन नेली.

37
1389 views