शौचालय अनुदानात गैरप्रकार तीन ग्रामसेवकांचे निलंबन....
अक्कलकुवा : तालुक्यातील बिजरीगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत १४२ वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामामध्ये १७ लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन तीन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.रत्नप्रभा ओमनसिंग पाडवी, किसन र पावरा व राकेश पावरा अशी निलंबित न करण्यात आलेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत.अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण ग्रामपंचायतअंतर्गत १४२ शौचालयांचे बांधकाम केले नसताना तत्कालीन सरपंच रोशन दिनकर पाडवी व तत्कालीन तिन्ही ग्रामसेवकांनी संगनमताने अपहार केल्याचा आरोप व तक्रारी जिल्हा - परिषदेत करण्यात आल्या होत्या. - त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने चार सदस्यीय चौकशी समिती नेमली होती.समितीने आपला अहवाल सादर ■ केल्यानंतर तिन्ही ग्रामसेवकांनी गटस्तरावर १७ लाख ४ हजार रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव सादर करून या निधीचा गैरवापर केल्याचेसमितीच्या चौकशीतून निष्पन्न झाले. प्रथमदर्शनी कर्तव्यात कसूर करून दोषी ठरल्यामुळे जिल्हां परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी निलंबनादेश अक्कलकुवा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. बिजरीगव्हाण येथील शौचालय बांधकामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात आमदार आमश्या पाडवी यांनीदेखील याबाबत १६ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्याकडे चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती.