
भारत भूषण पुरस्कार सोहळा: सामाजिक परिवर्तनासाठी योगदान दिलेल्यांचा दिल्लीतील सन्मान
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
पालघर - ३ जानेवारी २०२५: संविधान दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र, गोवा, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, उत्तर प्रदेश, तसेच दक्षिण भारतातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा, ठाणे, मुंबई, पालघर, पुणे, औरंगाबाद, चंद्रपूर आणि सोलापूर येथील सरपंच, ग्रामसेवक, पत्रकार, आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी पुरस्कार पटकावले.
सन्मानित व्यक्तींमध्ये उद्योजिका रत्न म्हणून सुनिता राजेंद्र कुंभार (उतरोली, भोर तालुका), भारत भूषण म्हणून विवेक गोविंद गुरव (वडगाव मावळ), तसेच उद्योग रत्न म्हणून संतोष पांडुरंग भिलारे यांचा समावेश होता. त्यांना प्रशस्तीपत्र, मेडल, आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी होत्या. त्यांच्या व्यतिरिक्त अल्पसंख्याक सदस्य रेंचलना, अभिनेत्री नुसरत जहाँ, प्रेरणा शर्मा भाटिया, डॉक्टर मनीष गवई, किशोर मकवान ठाकूर, चंदनसिंग, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष राहुल उके आणि इतर मान्यवरांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दीपक, गुलशन खत्री, मीनाक्षी लेखी, आणि प्रेरणा शर्मा यांनी प्रेरणादायी भाषणांद्वारे पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी समाजातील परिवर्तनासाठी आणि ग्रामीण विकासासाठी या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाचे विशेष उल्लेख केले.
या कार्यक्रमात सरपंच साधना निलेश बोरसा व त्यांच्या कुटुंबीयांनीही सक्रिय सहभाग घेतला. हा पुरस्कार सोहळा देशभरातील सामाजिक आणि ग्रामीण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला. यामुळे समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले.