logo

प्रसूतीवेळी मातेसह बाळाचाही मृत्यू , कुटुंबियांची सरकारकडे चौकशीची मागणी...

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर

जव्हार : मोखाडा तालुक्याची माता मृत्यूची घटना ताजी असतांना जव्हार कुटीर रुग्णालयात एका मातेची प्रसूती दरम्‍यान मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. यावेळी बाळाचा मृत्यू झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. गरोदर माता स्‍वतःहून प्रसूती करिता गेली असता अचानक मृत्यू कसा झाला याबाबत सखोल चौकशी करावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील गालतारे येथील कूंता वैभव पडवळे वय 31 या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने प्रसूती करिता जव्हार उपजील्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा नियमित विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता, मात्र येथे सुविधा मिळत नसल्याने, तुम्ही जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जा, असे सांगून, पुढील उपचारासाठी तिला जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मातेची ही तिसरी प्रसुतीची वेळ होती.बुधवारच्या रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान तिला प्रसूती कळा सुरू झाल्या, तिला प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले, यावेळी कॉन्टॅक्ट बेसिसवर असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉ. आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती सुरु केली, काही वेळातच अचानक या मातेनी तिथेच दम सोडला दरम्यान बाळाचे ठोके सुरू असल्याने प्रसूती करण्यात आली, मात्र प्रसूती होता होता, बाळाचाही मृत्यू झाला.रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी मागील कित्येक वर्षांपासून रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा पुरती ढिसाळ झाली आहे. यामुळे आदिवासी ग्रामीण भागात अनेक माता रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यातील घडल्या आहेत.माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती, तिचा नियमित उपचार कूर्झे प्राथमिक आरोग्य केंद्रात व विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात सुरू होता, आम्हाला विक्रमगड मध्ये सुविधा नाहीत तुम्ही जव्हारला घेऊन जा असे सांगण्यात आले, आम्ही तिला जव्हारला रुग्णालय दाखल केले, ती स्वतःहून प्रसुती गृहात गेली अवघ्या दहा मिनिटात तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी खबर मिळाली दरम्यान थोड्यावेळाने बाळाचा ही मृत्यू झाल्याची खबर मिळाली, आम्हाला हे ऐकून धक्काच बसला आहे. येथे शिकाऊ डॉकटर भरती केलेलं आहेत, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.अंकुश विष्णू अतकारी, चाबके-तलवली, मातेचा भाऊ.
प्रसूती वेळी माता व्यवस्थित होती, मात्र तिला अचानक तिला हृदय विकाराचा तीव्र झटका आला, आणि तीचा अर्ध्या प्रसूतीतच मृत्यू झाला, दरम्यान बाळाला वाचविण्याचाही खूप प्रयत्न करण्यात आला मात्र दोघांचा मृत्यू झाला. याबाबत शविच्छेदनानंतर खरे कारण कळेल.

(भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक)

53
9689 views