logo

माईंच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रबोधन...

धरणगाव -- येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त लक्ष्मणराव पाटील यांनी वैचारिक प्रबोधन केले.
याबाबत सविस्तर वृती असे की, आज दि. ०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील उपस्थित होते. आपल्या व्याख्यानात लक्ष्मणराव पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रसंगी 'जय ज्योती जय क्रांती 'चे नारे सरांसोबत विद्यार्थ्यांनी देखील लावले. सावित्रीमाईंच्या संघर्षामुळेच आज प्रत्येक स्त्री ही घराबाहेर पडून प्रगती करत आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने नवरात्रीच्या काळात नऊ रंगाच्या साड्या परिधान करताना एकदा विचार करावा की सावित्रीबाईंच्या साडीचा रंग कोणता होता? आपल्या व्याख्यानात सरांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्यावर आधारित 'स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले' या गीताचे गायनही केले. इतिहास काळातील उदाहरणे व दाखले देऊन पाटील सरांनी केलेलं व्याख्यान ऐकतांना सर्व विद्यार्थी तसेच श्रोतुवृंद मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदिरा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.एस.पाटील मॅडम, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे सर, शाळेचे सचिव सी.के.पाटील सर, पर्यवेक्षक ए.एस.पाटील सर, जेष्ठ शिक्षक एन.बी.पाटील सर, अश्विन पाटील सर, बी.पी.पाटील मॅडम यांच्यासह शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.यु.पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन स्वरुप पाटील सर यांनी केले.

73
4666 views