
अमरावतीत द्वितीय भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे.
अमरावती सायकलिंग असोसिएशन, दिशा संस्था,तसेच हव्याप्र. मंडळ द्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी अमरावती मध्ये द्वितीय भव्य विदर्भस्तरीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता होत आहे. या मध्ये १२ वर्षाखालील मुले-मुली, १५ वर्षाखालील मुले-मुली, १८ वर्षाखालील मुले-मुली, २१ वर्षाखालील मुले-मुली व खुले वयोगट पुरुष- महिला असे पाच वेगवेगळे गट ठेवण्यात आलेले आहेत. या मध्ये अंदाजे ४०० ते ५०० मुले मुली सहभाग घेण्याचा अंदाज आहे. ही स्पर्धा सेलिब्रेशन लॉन जुना बायपास,एमआयडीसी रोड येथून आरंभ होऊन गौरी इन एक्स्प्रेस हायवे रहाटगाव हा मार्ग राहणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनमध्ये सहभागी स्पर्धकांना हेल्मेट बंधनकारक राहील तसेच प्रथमोपचार सेवा, तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची चमूसुध्धा उपलब्ध राहणार आहे. स्पर्धकरिता प्रायोजक म्हणून बाहेती ब्रदर्स,सरोदे ऑप्टिकल्स, गंगा प्लायवूड व रघुवीर मिठाई यांनी स्वीकारलेली आहे. सर्व वयोगटातील विजयी स्पर्धकांना ऑनलाईन फिनिशर ई - सर्टिफिकेट देण्यात येईल. ज्या सायकलपटू कडे हेल्मेट नाही त्यांना स्पर्धेकरिता आयोजकाव्दारे नाममात्र शुल्कावर तात्पुरते स्वरूपात हेल्मेट उपलब्ध करून देण्यात येईल. नोंदणी करिता शेवटची तारीख ७ जानेवारी २०२५ रोजी आहे.
स्पर्धा ही अमरावती मध्ये तिसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात होत आहे तरी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिध्दी करून खेळाडूमध्ये जागृती निर्माण करावी व अमरावती सायकलिंग असोसिएशनला सहकार्य करावे, ही नम्र विनंती.