
लातूर जिल्ह्यातील 42 हजार बांधकाम कामगारांना वर्षभरात गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे
बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले जिल्ह्यातील हजारो कामगार कामानिमित्त बाहेरगावी जातात. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येतात. याची दखल घेत राज्य सरकारने अशा नोंदणीकृत कामगारांचे संसार पुन्हा उभे राहावेत, यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. बांधकाम साईट बदलल्यानंतर अनेक कामगारांना स्थलांतरित व्हावे लागते. स्थलांतर झाल्यानंतर अशा कामगारांना आपला संसार पुन्हा सुस्थितीत मिळावा, यासाठी गृहोपयोगी साहित्य सरकारकडून देण्यात येत आहे.आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
जिल्ह्यातील 42 हजार बांधकाम कामगारांना वर्षभरात गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण:कामगार विभागाकडून संच वाटपासाठी स्वतंत्रपणे एजन्सी नियुक्त
लातूर12 तासांपूर्वी
कामगार विभागाकडून संच वाटपासाठी स्वतंत्रपणे एजन्सी नियुक्त|
बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेले जिल्ह्यातील हजारो कामगार कामानिमित्त बाहेरगावी जातात. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येतात. याची दखल घेत राज्य सरकारने अशा नोंदणीकृत कामगारांचे संसार पुन्हा उभे राहावेत, यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. बांधकाम साईट बदलल्यानंतर अनेक कामगारांना स्थलांतरित व्हावे लागते. स्थलांतर झाल्यानंतर अशा कामगारांना आपला संसार पुन्हा सुस्थितीत मिळावा, यासाठी गृहोपयोगी साहित्य सरकारकडून देण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास ४२ हजार कामगारांना या गृहोपयोगी साहित्याचा लाभ मिळाला आहे, असे कामगार सहाय्यक आयुक्त मंगेश झोले यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. अशाच कामगारांना याचा लाभ दिला जातो. लातूर जिल्ह्यात ५२ हजार २५५ जीवित सदस्यांची नोंद आजघडीला आहे.
यापैकी जानेवारी ते डिसेंबर, २०२४ दरम्यान ४२ हजार ७२ लाभार्थ्यांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले आहे. कामगार विभागाकडून संच वाटपासाठी स्वतंत्रपणे एजन्सी नियुक्त करण्यात आली असून मंजूर लाभार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात येत आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून कामगार, त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांना शिक्षण, दवाखाना आदी कामांसाठीही रक्कम दिली जाते. मात्र, हा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. अशाच कामगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यादृष्टीने कागदपत्रांची पूर्तता करावी.
हे आहे संसारोपयोगी साहित्य लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या संसारोपयोगी साहित्यात ताटे ४, वाट्या ८, पाण्याचे ग्लास ४, पातेले (विविध आकाराचे) झाकणासह ४, मोठा चमचा २, पाण्याचा जग १, मसाला डब्बा १, डब्या झाकणासह (१४ ते २८ इंच) ३, परात १, कुकर ५ लिटर १, स्टीलची कबई १, स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह अशा ३० वस्तूंचा समावेश आहे.
कामगाराला विविध योजनेचा लाभ ^जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कामगारांसाठी कार्यालय उघडण्यात आले आहेत. याचा मुख्य उद्देश्य कामगाराला विविध योजनेचा लाभ देणे आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी या तालुक्यातील कार्यालयाला भेट द्यावी. तसेच योग्य कागदपत्रे सादर करीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही प्रकिया करताना दलालांना बळी पडू नये. मंगेश झोले, सहाय्यक कामगार आयुक्त
नवीन कामगारांना तालुकास्तरावर कार्यालये कामगारांना नोंदणीसाठी आता तालुकास्तरावर कार्यालये सुरू झाली आहेत. याठिकाणी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याठिकाणी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, बैंक पासबुक, ९० दिवस काम केल्याचे ग्रामीणमध्ये ग्रामसेवक व शहरात क्षेत्रीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदी कागदपत्रे सादर करायचे आहेत. त्यामुळे एजंटकडे जाण्याची गरज नाही.