
निषेध मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळ्णेबाबत,अकोला
प्रति,
मा.उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट,जिल्हा अकोला.
अर्जदार:- कु.चंचल पितंबरवाले अकोट, जि.अकोला
विषय:- निषेध मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळ्णेबाबत,अकोला
मी आपणास नम्रपूर्वक निवेदन सादर करतो की, मी एक स्थानिक महिला असून माझी बदनामी व मारहाणी करण्याच्या हेतूने भाजप जिल्ाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,अकोला यांनी दिनांक २९/१२/२०२४ ला अकरा पदाधिकाऱ्यांची यादी सोशल मीडियावर प्रसिद्धीस केली. त्या मध्ये माझ्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक केल्यामुळे माझी समाजात नाहक बदनामी होत असून मला अपमानकारक वागणूक मिळत आहे. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखवला गेलात्या अनुषंगाने निलंबन नमूद पत्रामध्ये राजेश रावणकार तालुकाध्यक्ष भाजपा अकोट व हरीश टावरी शहराधक्ष्य भाजपा अकोट यांनी
माझ्याविरोधात कटकारस्थान रचून जिल्हाध्यक्ष यांना निलंबन करण्यासाठीचा अहवाल सादर केला असा उल्लेख असल्यामुळे माझ्या मानहानीला हे जबाबदार आहेत त्यामुळे मी आजपासून पुढील सात दिवासच्या आत त्यांना माझी माफी मागण्याची संधी दिली आहे परंतु या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी माझी माफी न मागितल्यास दिनांक ०८/०१/२०२५ रोजी अकरा वाजता शिवाजी चौक अकोट येथून शेकडो महिलांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढणार आहे. त्यासोबतच हा मोर्चा हरीश टावरी व राजेश रावणकार यांच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी धरणे आंदोलन सुध्धा करणार आहोत.
तरी हा लढा माझ्यासह अनेक महिलांच्या सन्मानकरिता उभारलेला आहे याकरिता आपण मला निषेध मोर्चा करिता परवानगी देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपली विश्वासू
कुमारी चंचल पितांबरवाले