
धानिवरी गेठीपाडा शाळेत मेलझोल संस्थेच्या वतीने संगणक कक्षाचे उद्घाटन
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी,पालघर
डहाणू :- धानिवरी गेठीपाडा शाळेत दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी मेलझोल संस्थेच्या वतीने [अफलाटॉन रिसर्च सेंटरच्या] म्हणजे संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले,या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सौ. श्री. पंकजा सिरसागर उपस्थित होत्या,उद्घाटनप्रसंगी बोलताना सौ. पंकजा सिरसागर म्हणाल्या की, "सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. यामध्ये प्रगती करण्यासाठी मुलांना लहानपणापासून संगणकाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागातील अनेक मुले आर्थिक अडचणींमुळे संगणक शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे मुलांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेलझोल संस्था विविध उपक्रम राबवत आहे,या कार्यक्रमात जि.प. सदस्य शैलेश करमोडा, धानिवरी सरपंच शैलेश कोरडा ओसरविरा सरपंच नरेश कोरडा, केंद्रप्रमुख मस्कर सर, ग्रामविकास अधिकारी संतीश देशमुख , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा मलवकर तसेच ग्रामपंचायत सदस्य अंकुश गोरवाला, गणेश पडवले, कैलास मलवकर, लक्ष्मण मलावकर आदी मान्यवर उपस्थित होते,कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना आधुनिक युगाशी जोडणे हा होता.