वेळ अमावस्या (सण घरा3
वेळ अमावस्या आली की गावकरी आप आपल्या शेती मधे जावून.शेतामध्ये उगवल्या जाणाऱ्या ज्वारी , मके यांच्या जो कडबा असतो. त्यांच्या पासून कोप/खोप उभारली जाते. त्या खोपिला मखमली शाल ओढवून सजवले जाते. शेतीतील माती ओली करुन. त्याचा चिखल करुन त्या पासून लक्ष्मि स्वरूपात त्याला हळदी कुंकू लावुन सजवून पूजा केली जाते.पूजेला केळी, सफरचंद, पेरू, या सारखी फळे पुढ्यात ठेवून कॉपीची शोभा वाढवली जाते. पिठाचे पणती बनवून त्यात दिवे लावले जातात. परिवारातील दोन व्यक्ती कोपीच्या चहू बाजूंनी चर शिंपवून वलग्या वलग्या पालम चालग्या असे घोषणा करतं. पाणी आंबिलीचे शितडे उडवत गोल फेऱ्या घालत पूजा संपन्न करत. मग जेवणाला सुरूवात होते.त्या मधे भजी, आंबील, खीर, तिळाच्या गोड अशा भाकरी, सपक साधे डाळ वरण, भाजिवर झमझामित असा तेलाला तडका दिलेला तेल भजिवर वडाला जातो. गावातील आमंत्रित लोक तर असतात पण त्यात भजी आणि आंबील म्हणजे प्रत्यकाचे आवडते. रानो रान फिरत आस्वाद घेतं सर्वजण. दिवस भर हा का र्या क्रम चालूच असणार. दिवस मावळायला आला की दूध उकळले जातात. त्यवसाबोत वेळ अमावस्या पार पडते