logo

येळवस (दर्ष वेळ अमावस्या) *सण शेतकऱ्यांचा*

*लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मूळ कानडी शब्द येळ्ळ अमावस्या म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या परिवारासह शेताकडे जातात. आदल्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या खोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पंचमहाभूतीची पुजा करतात ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, खिर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या आस्वाद घेतात. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो शहरे ओस व खेडी वेळ आमावस्येच्या निमित्ताने माणसांनी फुलून जातात असा हा निसर्गाशी नातं सांगणाऱ्या आगळ्या वेगळ्या सणाच्या सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा..!*

*- कामगार आयुक्त झोले साहेब*

1
410 views