logo

मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र तरुणांसाठी लाभदायी - रुपेश श्रीरामे :-भिवापूर जि.नागपूर

भिवापूर : भारतीय बाजारपेठेत अनेक मोबाईल कंपन्या कार्यरत आहेत. उत्पादन, जोडणी, वितरण, विक्रीपश्चात सेवा आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो आहे. अनेकदा मोबाईल कंपन्या विक्रीपश्चात सेवा वर्षभर देत असतात. या सेवेसाठी त्यांना कुशल तांत्रिक मनुष्यबळाची गरज भासते. या सर्व बाबींचा विचार केला असता मोबाईल दुरुस्ती हे क्षेत्र तरुणांसाठी लाभदायी ठरणारे आणि अखंड चालू राहणारे क्षेत्र आहे,असे मार्गदर्शन सरपंच रुपेश श्रीरामे यांनी उपस्थित मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षणाच्या समोरोपीय कार्यक्रमात सोमवारी (ता.३०) प्रशिक्षणार्थींना केले.
             तास येथे सरपंच रुपेश श्रीरामे यांच्या प्रयत्नातून आयसीआयसीआय फाऊंडेशन मार्फत एक महिन्याचे मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण बेरोजगार तरुणांना देण्यात आले.ट्रेनर खुशाल चौधरी यांनी प्रशिक्षण दिले.सोमवारी प्रशिक्षणाचा समारोप झाला.यावेळी रिचा मॅडम व अखिलेश मोहोड यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थींना मोबाईल दुरुस्ती किटचे वाटत करण्यात आले.

0
84 views