logo

सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने उपायुक्त यांना निवेदन. बेघर कुटुंबाचा स्वतःचे घर भेटण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा.

सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने उपायुक्त यांना निवेदन.
बेघर कुटुंबाचा स्वतःचे घर भेटण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा.
बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नं.८७/१अ. क्षेत्र शासनाची असून मनपाने घेऊन रमाई आवास योजनेसाठी मिळावी- बाळासाहेब वाघमारे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे बोल्हेगाव गावठाण येथील सर्वे नं.८७/१अ. पैकी क्षेत्र २ हेक्टर ५ आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यातच आहे. ती जागा मनपा ने घ्यावी व ती जागा पडिक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे ५० कुटुंब गांधीनगर बोल्हेगाव गावठाण येथे सुमारे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर रहिवास करत आहे. त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबवण्याची मागणी मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे समवेत कर्मा वावरे, बाळासाहेब साठे, चंद्रभागा लोखंडे, अतुल काते, आशा शेंडगे, जया मोकळ, सुमन शेवाळे, आशा पिंगळे, अलका पाटील, वैशाली शिरसाट, आशा पनरे, रूपाली वाल्हेकर, सुवर्णा ब्राह्मणे, उषा बुडखुडे, परसराम वाघमारे, रेणुका शिंदे, अनिता साबळे, सरस्वती साठे, जगन्नाथ भोसले, संगीता गुंजाळ, अर्चना ओहोळ, अनिता कुऱ्हाडे, मंगल शिंदे, सविता आव्हाड, बबई ससाने, अनिता वाघमारे, निवृत्ती पिंगळे, आशा काते, राणी दिवटे, लक्ष्मी भालेराव, विशाल सावे, वनिता बाराहाते, प्रशांत लोंढे, सतीश लोखंडे, मंगल आढागळे, अनिता लोखंडे, अनिता थोरात, पायल लोखंडे, अशोक वाघमारे, वनिता बाराते आदीसह बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे १५ ते २० वर्षापासून भाडेतत्त्वावर राहत असून हे कुटुंब बेरोजगार आहे. त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा करतात मजुरीचे काम करतात हमालीचे काम करतात असे वेगवेगळ्या प्रकारे आपले उपजीविका चालवीत आहे. परंतु त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून हे भाड्याच्या घरात राहून भाडे भरावे लागतात तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाही अशा त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोल्हेगाव गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक जागा सुमारे १ एकर रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, यशवंत आवास योजना राबवण्यासाठी घरकुल साठी मिळावी त्यामुळे गोरगरीब जनता ही घराचे भाडे न भरता स्वतःच्या घरात जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

8
1356 views