logo

जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची नुतन कार्यकारिणी जाहीर

चिखली : - शहर व ग्रामीण स्तरावरील छोटे-मोठे पत्रकारांची एकजूट व्हावी छोट्या- मोठ्या पत्रकारांना निर्भयपणे लिखाण, स्वतंत्र प्रदान व्हावे व जनसामान्य पत्रकारांची गळचेपी होऊ नये म्हणून जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची स्थापना करण्यात आली सदर पत्रकार संघटनेची चिखली तालुका नुतन कार्यकारणीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २९/१२ /२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय सवणा फाटा चिखली येथे घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पवार हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय जगदीश जयस्वाल व बुलढाणा तालुका अध्यक्ष धीरज अवसरमोल हे होते तसेच या बैठकीमध्ये शहर व ग्रामीण पत्रकारांचे भव्य संघटन उभारण्यात यावे या मुद्द्यावर साधक -बाधक चर्चा झाली प्रत्येक पत्रकारास शासनाने समसमान धोरणाप्रमाणे वर्तणूक द्यावी तसेच समाज जीवनातील विविध प्रश्नांसाठी सदर संघटनेच्या सभासदांनी तन-मन-धनाने झटावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच जनकल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेची चिखली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष मंगेश भोलवणकर, कार्याध्यक्ष प्रशांत जैवाळ , उपाध्यक्ष राधेश्याम काळे , सिद्धेश्वर देव्हरे, सचिव महेंद्र कुमार हिवाळे, सहसचिव शहबाज शेख, कोषाध्यक्ष निलेश कोल्हे, सहकोषाध्यक्ष सोपान परिहार, संघटक शे.कदीर भाई, सहसंघटक हरसिंग छर्रे, सदस्य राजेश लोखंडे, सागर जाधव, उस्मान चौधरी, रेहान शेख, अप्पू खान, असलम हिरेवाले, दिलीप हातागळे, किरण शेजोळ, राजेंद्र बिडवे, जाकीर खान, विशाल गवई यांची चिखली तालुका कार्यकारणी मध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली .

2
712 views