logo

चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्यास अटक

भिवापूर : आठ वर्षीय चिमुकलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना  शनिवारी (ता.२८) दुपारच्या सुमारास घडली.आरोपी विरुद्ध पोक्सो, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वरील कारवाई करण्यात आली.
           रवींद्र गणपत पसारे (वय ३२ वर्ष, रा. भिवापूर)
असे आरोपीचे नाव आहे. दुपारी पिडीत चिमुकली तिच्या चुलत बहिणीसोबत (८ वर्ष) अंगणात खेळत होती. एवढ्यात मोहल्ल्यातच राहणारा आरोपी रवींद्र तिथे आला व खरड्याचे बनविलेले घर दाखवितो माझ्या घरी चला म्हणत त्यांना जवळच असलेल्या त्याच्या घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर आरोपीने पीडितेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून कशी बशी सुटका करुन घेत दोघीनी तिथून पळ काढला. पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने लगेच पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी तातडीने कारवाई करीत आरोपीला त्याच्या घरून ताब्यात घेतले. पुढील तपास उमरेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

0
91 views