हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यामध्ये आठ महिन्यापुर्वी सापडलेल्या डोके नसलेल्या धडाचे गुढ उकलले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा केला उलगडा.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर
महाराष्ट्र
पोलीस
राणाय खलनिहर
पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर
महाराष्ट्र
दिनांक :- २८/१२/२०२४
प्रेसनोट
हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यामध्ये आठ महिन्यापुर्वी सापडलेल्या डोके नसलेल्या धडाचे गुढ उकलले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा केला उलगडा.
दिनांक 04/04/2024 रोजी हुतात्मा पार्क येथे जयंती नाल्यातील गाळ जेसीबीने काढण्याचे काम महानगरपालीके मार्फत चालु असताना एक पुरूष जातीचे, डोके नसलेले, सडलेल्या अवस्थेतील धड अंदाजे वय 35 ते 40 वर्षे हे जेसीबी चालकाला दिसले होते. त्यावरून जुना राजवाडा पोलीस ठाणेस अकस्मात मयत रजि.नं. 47/2024 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे अपमृत्यु दाखल करून राजवाडा पोलीस ठाणेकडून पुढील तपास चालु होता.
धडास डोके नसलेने तसेच अंगावर कपडे नसलेने व धड सडलेल्या अवस्थेत असलेने त्याची ओळख पटली नाही.तसेच नाल्यातील गाळ काढते वेळी जेसीबीमुळे मृतदेहाचे डोके कट झाले असावे असा प्राथमिक अंदाज होता. त्यावेळी मयताच्या डोक्याचा नाला परिसरात शोध घेवूनही मयताचे डोके मिळून आले नव्हते. परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये शार्प कट असा डॉक्टरांचा अभिप्राय आल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना त्यांचे शाखेकडून सदर मयताचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.
मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत यांनी दिले आदेशाप्रमाणे श्री. रविंद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, संतोष बरगे, प्रविण पाटील, महेंद्र कोरवी व प्रदिप पाटील यांची दोन तपास पथके नियुक्त करून त्यांना तपासाबाबत योग्य मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
नमुद पथक तपास करीत असताना पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मिसिंग व्यक्तींची माहिती घेवून धडाचे अंगावरील फक्त अंडरविअरचे कंपनी वरून नातेवाईकांचा शोध घेतला असता सदर मयत व्यक्ती अशोक पाटील, रा. पिशवी, ता. शाहुवाडी अशी असल्याची माहिती मिळाली. मयताचे नातेवाईकांच्याकडे तपास केला परंतु सदर मयताचा कोणी घातपात केला याबाबत काही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही. परंतु पथकाने सदर तपासामध्ये सातत्य ठेवून धड सापडलेल्या परिसरामध्ये साध्या वेशात वावर ठेवून गुप्तपणे माहिती काढत असताना डवरी वसाहत मधील रावण उर्फ अजय
शिंदे व त्याचे दोन मेव्हणे तसेच त्याचे इतर साथीदर यांनी हुतात्मा पार्कमध्ये एका व्यक्तीचा खुन करून त्याचे मुंडके कापून धड नाल्यामध्ये टाकले व मुंडके गाळामध्ये पुरले आहे. 'अशी गोपनीय बातमी मिळाली असता पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांना तात्काळ आरोपींची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्यावेळी असे समजले की, ज्या दिवशी सदर मयताचे धड मिळून आले त्याच दिवशी दिनांक 04/04/2024 रोजी सायंकाळी 05.00 वा. चे सुमारास रंकाळा चौपाटी येथे रावण उर्फ अजय शिंदे याचा निर्घुण खुन झाला होता. त्यानंतर रावण उर्फ अजय शिंदे याचे मेव्हणे व इतर साथीदार यांचा नेहमी वावर कोठे असतो, ते काय काम करतात व ते सध्या कोठे आहेत याची पथकाने गोपनीयरित्या माहिती घेवून त्यांना एकाच वेळी रत्नागिरी, डवरी वसाहत, कळंबा येथुन ताब्यात घेवून त्यांना वेगवेगळे ठेवून त्यांचेकडे तपास केला असता सदर प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे प्रथम सांगितले. आरोपी खोटे बोलत असून पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे लक्षात आल्याने आरोपींना पुन्हा विश्वासात घेवून त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपीनी संगणमताने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली देवून त्यातील अतुल शिंदे याने माहिती दिली की, रावणचा खून होण्याचे आधी 15 दिवसांपुर्वी अभिषेक शिंदे हा रात्रीच्या वेळी हुतात्मा पार्क गार्डनमध्ये बसला होता. त्यावेळी अभिषेक व मयत अशोक पाटील या व्यक्तीचा किरकोळ कारणावरून वाद झाला त्यावेळी अभिषेकने आकाश, अजित उर्फ रावण, अतुल शिंदे, सुरज माळी व ओंकार माने यांना बोलावून मयत व्यक्तीच्या मानेवर एडक्याने वार करून ठार केले. त्यानंतर मृतदेह उचलुन नाल्यामध्ये नेवून मयताची ओळख पटू नये तसेच आपण पकडले जाऊ नये म्हणून नाल्यातच त्याचे मुंडके एडक्याने कापुन त्याचे अंगावरील कपडे काढून नाल्यात फेकली, धड पुलाचे खाली नाल्यात टाकले व मुंडके तिथुनच काही अंतरावर नाल्याचे कडेला गाळात पुरून पुरावा नष्ट करून तेथुन निघूण गेले.त्यानंतर काही आरोपी कोल्हापूर मधुन फरार झाले होते. नमुद गुन्ह्यात निष्पन्न झाले आरोपीत यांची नावे व पत्ते 1] अभिषेक मंजुनाथ माळी, वय 20 वर्षे, 2] अतुल सुभाष शिंदे, वय 23 वर्षे, दोघे रा.डवरी वसाहत. यादव नगर, कोल्हापूर 3] अजय उर्फ रावण दगडु शिंदे, वय 25 वर्षे, रा. डवरी वसाहत. यादव नगर, कोल्हापूर [मयत ] व इतर 03 अल्पवयीन मुले.
सदरबाबत राजवाडा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशाप्रकारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सदर प्रकरणाचा अत्यंत कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करून डोके नसलेल्या, धड सडलेल्या, कपडे नसलेल्या, ओळख न पटलेल्या मयताची ओळख पटवून, आरोपीतानी पचविलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याची उकल आठ महिन्यानी केलेली आहे..
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार परशुराम गुजरे, वैभव पाटील, विशाल खराडे, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रविण पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, सुशिल पाटील, कृष्णात पिंगळे व नामदेव यादव यांनी केली आहे.