logo

लहान मुलांना व्यावहारिक व्यवहारिक बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोधेगाव मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष भागिनाथ रांधवणे व संदीप शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले या बाजारामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला व खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते प्रामुख्याने यामध्ये पाणीपुरी पावभाजी वडापाव सँडविच पोहे यांसारखे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी आणले होते हा मेळाव्याचे आयोजन करण्यामागचा उद्देश मुलांना दैनंदिन व्यवहार समजावा व त्यांच्या कलागुणांना वाद मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थांनी पालकांनी व विशेषता युवा वर्गाने सक्रिय सहभाग घेतला या मेळाव्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक सह सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

28
4226 views