
गिरणी कामगार एकजूट संघटना- निर्धार मेळाव्यात आपली प्रबळ उपस्थिती दाखवून आपल्या आवाजाला सामर्थ्य द्या.
प्रिय गिरणी कामगार बांधव आणि त्यांच्या वारसांना,सप्रेम नमस्कार,
सध्या आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचा काळ आहे. २९ डिसेंबर २०२४ रोजी, सकाळी १०:०० वाजता, सुरेंद्र गवसकर सभागृह, मराठी ग्रंथालय, शारदा टॉकीजजवळ, दादर (पूर्व) येथे होणाऱ्या एकजूट संघटना- निर्धार मेळाव्यात आपली प्रबळ उपस्थिती दाखवून आपल्या आवाजाला सामर्थ्य द्या.
आजच्या मुंबईत मराठी माणसाचे हक्क डावलले जात आहेत. एका बाजूला अदानीसारख्या *बड्या उद्योजकांना १५०० एकर जमीन* सहज उपलब्ध करून दिली जाते, पण गिरणी कामगारांच्या हक्काच्या जमिनींसाठी शासन सतत टाळाटाळ करत. खरंतर यामागे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा घाणेरडा कटच आहे. मराठी माणूस, खासकरून गिरणी कामगार, तुमच्या राजकीय स्वार्थीपणाचा बळी ठरत आहे.
मराठी नेत्यांनो,
आता तरी जागे व्हा! आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी करा. मराठी माती आणि गिरणी कामगार यांचा सन्मान टिकवण्यासाठी आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे. शेलू किंवा वांगणीसारख्या मुंबईबाहेरील भागात गिरणी कामगारांची घरे देणे म्हणजे त्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्यासारखे आहे. गिरणी कामगारांचा संघर्ष केवळ छतासाठी नाही, तर त्यांच्या मुंबईतील हक्कांसाठी आहे.
संयुक्त मराठी मुंबई चळवळ ठाम आहे:
सर्व गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत.
उर्वरित सर्व कामगारांचे अर्ज त्वरित भरून घेतले गेले पाहिजेत.
कोणत्याही परिस्थितीत गिरणी कामगारांसाठी मुंबईच्या बाहेरचा पर्याय मान्य केला जाणार नाही.
या निर्णायक क्षणी २९ डिसेंबर २०२४ रोजीच्या मेळाव्यात आपली उपस्थिती अनिवार्य आहे. आपल्या हक्कांसाठी आणि मराठी मातीसाठी लढण्याची हीच वेळ आहे. चला, एकत्र येऊया आणि आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका घेऊया!
संपर्क:
श्री. हरिश्चंद्र करगळ (संपर्क प्रमुख)
📞 संपर्क क्रमांक: 77385 91262
धन्यवाद!
आपल्या न्यायासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी!
आपले सहकारी,
संयुक्त मराठी मुंबई चळवळ