दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला मारहाण : गुन्हा दाखल
प्रतिनिधी : राधाकिसन क्षीरसागर, अहिल्यानगर.
अहिल्यानगर अपडेट
👉दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना नवनागापूरच्या चेतना कॉलनीतील वक्रतुंड गल्लीत घडली. मोनिका राहुल बोरूडे (वय ३२) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.
मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राहुल विजय बोरूडे याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. रविवारी सकाळी फिर्यादी घरातील काम आवरत असताना त्यांच्याकडे पती राहुलने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने त्याला पैसे नाही असे म्हणताच त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार टेमकर करत आहेत.