जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद ; ६ गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश...
प्रतिनिधी : राधाकिशन क्षीरसागर, अहिल्यानगर.
अहिल्यानगर अपडेट
👮♂️राहुरी, संगमनेर, राहाता तालुक्यात जबरी चोरी, तसेच सोनसाखळी चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. या आरोपीकडून ६ गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. सचिन लक्ष्मण टाके, (रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
🔗 सापळा रचून आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी श्रीरामपूर येथील आसनेवस्ती येथे असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार राजेंद्र भिमा चव्हाण, (रा.खटकळी, बेलापूर, ता.श्रीरामपूर), (फरार) याचेसह चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपीला राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.