
राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा अहमदपूर मतदार संघात ठिक ठिकणी जंग्गी स्वागत सत्कार .
शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे & शिवाजी श्रीमंगले) (जि. लातूर )
राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा अहमदपूर मतदार संघात ठिक ठिकणी जंग्गी स्वागत सत्कार .
शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे & शिवाजी श्रीमंगले) (जि. लातूर )
राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले आसता अहमदपूर मतदार संघात प्रवेश होताच त्यांचा सांगवी माळेगाव पासून ते शिरूर ताजबंद दरम्यान ठिक ठिकाणी मोटार सायकल रॅलीने बँन्ड डिजे वाजवून फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून भव्य यथोचित सत्कार करण्यात आला .
मंत्री ना. पाटील यांचे २२ डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अहमदपूर तालुक्यातील सांगवी फाटा येथे आगमन झाले .त्यानंतर भक्तीस्थळ येथे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी दर्शन घेतले सत्कार स्विकारूला .साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, टिपू सुलतान स्मारक येथे त्यांचे स्वागत झाले सत्कार समारोह झाला त्यानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन, महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन हॉटेल भगीरथी समोर स्वागत सत्कार झाला . त्यानंतर अहमदपूर येथील प्रसाद गार्डन येथे बालाजी विनायक पाटील यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी सदिच्छा भेट दिले व सत्कार स्विकारला . जवळगा, थोरली वाडी, महादेववाडी पाटी प्रसंगी सत्कार स्विकारला .शिरूर ताजबंद येथील बालाजी मंदिर येथे दर्शन, तसेच राजकुमार चव्हाण यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी सदिच्छा भेट दिली व सत्कार स्विकारला
शिरूर ताजबंद येथील शिवछत्रपती नगर येथे इंद्रायणी निवासस्थानी यानंतर शिरूर येथील येरमे यांच्या व्यवसाय चे उदघाटन तसेच माजी कार्यकारी अभियंता शुभाषराव पाटील यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट सत्कार स्विकारला,भाजपाचे नेते शिवराज पाटील यांच्या मेडीकल व दवाखान्याचे उदघाटन केले सत्कार स्विकारला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले सत्कार स्विकारला .महादेव मंदिर येथे दर्शन व मंदिर व्यवस्थापन समितीमार्फत स्वागत स्विकारले . या प्रसंगी कृउबा सभापती मंचकराव पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भारत चामे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शिवानंद हेंगणे, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज बाबासाहेब पाटील, सोसायटी चे अरमन तुळशीराम भोसले,हायकोर्ट वकिल अँड विजयकुमार शेळके, लातूरचे सुप्रसिध्द डॉक्टर दिपक भराटे, सेक्रटरी गोविंदराव सुर्यवंशी, भाजपाचे नेते गणेशराव कापसे पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष बालाजी पडोळे, दिलीप पाटील, शिवाजी श्रीमंगले, शिवराज पाटील अंबेगावकर, बाबुराव बोडके, महेश मंदिर व्यवस्थापक शिवाजी स्वामी, दतात्रेय बुरावार,माजी सरपंच गंगाधर ताडमे, या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तसेच श्री महेश मंदिरात पर्यन्त ढोलताशा सह वाजत गाजत रॅलीने भव्य प्रचंड स्वागत झाले.