logo

वर्धा :- नागठाणा रस्त्यावर अतिक्रमामुळे वाहतुकीस अडथळा,... जि. प. माजी सदस्य मनिष फुसाटे यांचे जिल्लाधिकाऱ्यांना निवेदन...

वर्धा :- ग्रामपंचायत सिंदी (मेघे )मद्धे जयभिम बुद्ध विहार ते नागठाणा या रस्त्याचे काम सुरु आहे, या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहणांचे ये जा सुरु असते,कारण या मार्गाने सावंगी रुग्णालय, व नागपूर यवतमाळ बायपास असल्यामुळे व हा मार्ग येण्या जाण्या साठी सुरक्षित असल्यामुळे जास्तच वर्दळ असते, आ. पंकज भोयर यांनी मुख्यामंत्री योजनेमधून हा रस्ता बनवण्यासाठी काही महिन्या अगोदर भूमिपूजन केले होते, गेल्या दोन महिन्या पासून या मार्गाचे काम सुरु असून या रस्त्याला लागून असलेल्या शेतकऱ्याने रस्त्याच्या बाजूला सिमेंट चे खांब गाडून अतिक्रमण केले आहे, त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे, आणि अपघात होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही, तरी संबंधित विभागाला सूचना करून अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा परिसरातील नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल असा इशारा जि. प. माजी सदस्य मनीष फुसाटे यांनी निवेदना द्वारे दिला आहे,.

39
3003 views