*सालगड्याचा मुलगा ते विधान परिषदेचे सभापती पर्यंत फुललेले नेतृत्व ना.प्रा.राम भामाबई शंकर शिंदे...
चौंडी या लहान गावातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम भामाबाई शंकर शिंदे यांनी विधान परिषदेचे पंधरावे सभापती म्हणून पद ग्रहण केल्याचे पाहून ओबीसी आणि धनगर समाजाच्या आनंदाला पारावार उरला नाही.प्रा.राम शिंदे हे सभापती झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेचे सभापती म्हणून अविरोध निवड होणार हे निश्चित झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रा.राम शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा माझा प्रयत्न आहे.प्रा.राम शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1969 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील शंकर आणि भामाबाई शिंदे या गरीब कुटुंबात झाला.प्रा.राम शिंदे यांचे पिता शंकर शिंदे दुसऱ्याच्या शेतात सालगाडी म्हणून काम करीत असत.
यांच्या कामामुळे हे विशेष..2009 मध्ये जामखेड कर्जत हा मतदार संघ खुल्या गटासाठी झाल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान सभेसाठी उमेदवारी दिली.प्रा.राम शिंदे हे कर्जत जामखेड मतदार संघात प्रचंड मतांनी विजयी झाले..
2009 ते 2014 या पाच वर्षाच्या काळात विरोधी पक्षाचा आमदार म्हणून विकास कामे केली.या विकास कामाच्या जीवावर 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आणि विजयी झाले.2014 मध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा.राम शिंदे यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिले.आणि गृह राज्यमंत्री म्हणून ग्रामीण विभाग त्यांच्याकडे सोपविली.प्रा.राम शिंदे यांच्या कामाचा धडाका पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी असलेले जलसंधारण विभाग दिला आणि अतिशय उत्कृष्ट कार्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील मंत्री म्हणून राज्यात ओळखले जाऊ लागले.
2019 मध्ये प्रा.राम शिंदे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचे नातू बारामतीचे रोहित पवार यांना उमेदवारी दिली.पवार घराण्याचा वारसा असलेल्या रोहित पवार यांनी प्रा.राम शिंदे यांना पराभूत केले..प्रा.राम शिंदे यांची विधी मंडळातील गरज ओळखून आणि धनगर समाजाचा एक प्रभावी नेता म्हणून जून 2022 मध्ये विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देऊन आमदार केले.या आमदारकीच्या आणि मंत्रिपदाच्या काळातील काम पाहून पुन्हा 2024 मध्ये जामखेड कर्जत मधून भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली.
या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना अतिशय कडवी आणि अटीतटीची लढत देत अवघ्या बाराशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला हे विशेष.पण या पराभवाने खचून न जाता मोठ्या धीराने हा पराभव स्वीकारला.आणि लोकमताचा आदर केला.आणि आज पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी,गृहमंत्री ना.अमित शहा,भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. जे. पी. नडडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाला आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेत विधान परिषदेचे सभापती म्हणून अविरोध निवड केली आहे.प्रा.राम शिंदे यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा देताना यश मिळावे ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चरणी प्रार्थना करतो.पत्रकार रविराज शिंदे