logo

समता सैनिक दलाचे #स्मृतिशेष_सैनिक_दादा_अंबादे यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त १९ डिसेंबर २४ रोजी सायं ७:०० वा. मंगलमंडप येथे समता सैनिक दल नागपूर मुख्यालयाद्वारे

समता सैनिक दलाचे #स्मृतिशेष_सैनिक_दादा_अंबादे यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त १९ डिसेंबर २४ रोजी सायं ७:०० वा. मंगलमंडप येथे समता सैनिक दल नागपूर मुख्यालयाद्वारे
#परिसंवाद आयोजीत करण्यात आला . आंबेडकरी चळवळीतील सक्रिय विचारवंत व साहित्यिक विनायकरावजी जामगडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, छायाताई खोब्रागडे, भंते गौतमपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या परिसंवादाची अध्यक्षता विनायकरावजी जामगडे यांनी केली . कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली . समता सैनिक दलाद्वारे बाबासाहेबांना जयभीम सलामी देण्यात आली . सचिन कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत स्मृतिशेष दादा अंबादे यांच्या जीवनप्रवासावर व दलातील अमूल्य कार्याबद्दल प्रकाश टाकला .
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल व परभणीतील घटनेबद्दल एकमताने संपूर्ण सभागृहात निषेध नोंदवण्यात आला. प्रमुख वक्ता छायाताई खोब्रागडे यांनी समता सैनिक दलाचे समाजातील महत्त्व सांगतांना म्हणल्या की बाबासाहेबांना हवा असलेला शिस्तबद्ध समाज स्थापनाची जबाबदारी समता सैनिक दलाने पार पाडावी. प्रा. देवीदास घोडेस्वार यांनी
गृहमंत्री अमितशाहांनी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह केलेल्या विधानवर प्रकाश टाकत भारतीय संविधानातील नैतिक मूल्ये व लोकशाही पायदडी तुडवत असलेल्या केंद्रातील मनुवादी विचारसरणीविरुद्ध एकजुटीने प्रतिकार केला पाहिजे असे प्रतिपादन केले . आपले अध्यक्षीय विचार मांडतांना विनायकरावजी जामगडे म्हनाले बाबासाहेबांच्या हयातीपासून समता सैनिक दलाने आजपर्यंत अनेक प्रकारे आपली जबाबादी पार पाडली असून वर्तमानतील आणि भविष्यातील सामाजिक आव्हाने दलापुढे आहे त्यासाठी नावाप्रमाणे समजात समता स्थापीत केली पाहिजे . समता सैनिक दलाचे वर्धा , व उमरेडच्या सैनिकांनी आवर्जून या कार्यक्रमास हजेरी लावली. नलिनी ताई दादा अंबादे व संपूर्ण परिवाराच्या पुढाकाराने या परिसंवादाचे सफलतापूर्वक आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन सचिन टेंभूरने यांनी केले व शैलेश बागडे यानी आभार प्रदर्शन केले . मा. एन. टी. मेश्राम सर व सैनिक चंदू वाघमारे नंदू वाघमारे पंकज डोंगरे, रामा डहरिया,बॉबी गजभिये, विकास जांभुळकर,प्रदिप वर्मा,उज्वल बागडे,तनु मेश्राम यांनी परिसंवादाच्या आयोजनास विशेष सहकार्य केले .

3
1272 views