logo

अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन पोलीसांनी आरोपीस चोवीस तासाचे आत केले जेरबंद

प्रेस नोट दिनांक- 20/12/2024

अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन पोलीसांनी आरोपीस चोवीस तासाचे आत केले जेरबंद

फिर्यादी नामे- मनिषा आप्पासाहेब काजळे वय-45 वर्षे धंदा-शेती रा. बाडगव्हाण शेवगाव ता.शेवगाव जि.अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन दिनांक 18/12/2024 रोजी त्यांचे पती नामे- आप्पासाहेब भानुदास काजळे वय - 54 वर्षे रा. बाडगव्हाण ता.शेवगाव यांना दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले आहे वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 1001/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम- 140(3),3(5) प्रमाणे दिनांक-18/12/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी मा.पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांनी योग्य वेळी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना करण्यात आली होती. अपहरित व्यक्तीचा शोध घेत असतांना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहीती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे अशी माहीती मिळाल्याने अपहरित व्यक्तीस व आरोपी यास ताब्यात घेवुन आरोपीस त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- सोमनाथ बाबुश्या जाधव रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड असल्याचे सांगितल्याने सदर आरोपीस व अपहरित व्यक्तीस ताब्यात घेवुन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो अहिल्यानगर, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, पोसई प्रविण महाले, पोहेकाँ चंद्रकांत कुसारे, पोहेकाँ आदिनाथ खेडकर, पोना ईश्वर गर्जे, पोना संदिप आव्हाड, पोकाँ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर,पोकाँ फलके, पोकॉ प्रशांत आंधळे, पोकॉ देविदास तांदळे, पोकाँ एकनाथ गरकळ तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई प्रविण महाले हे करत आहेत.

0
19 views