जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाही...
हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील , पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते,
जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाही...
हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील , पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते,
त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा. पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे.
शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत. कृपया वेळ आली आहे, "जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे.
केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
◼केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
◼केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल असतात, जे ग्रीन टीमध्ये ऑर्गेनिक अँटिऑक्सिडंट असतात. हे पॉलिफेनॉल शरीरातील सर्व मुक्त रॅडिकल्सशी लढतात आणि आजारांपासून रक्षण करतात. केळीच्या पानांमध्ये पॉलीफेनॉल ऑक्सिडेसचे महत्त्वपूर्ण प्रमाण देखील आहे, एक एन्झाइम जो पार्किन्सन रोगावर उपचार करू शकतो.
◼केळीचे पान जिवाणू नष्ट करण्यास मदत करतात. केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता कमी होते.
◼केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
◼केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.
◼केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
◼केळीच्या पानांच्या रसामध्ये डिटॉक्सीफाईंग गुण असतात. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत मिळते. तसेच शरीराला ऊर्जा सुद्धा मिळते.
◼त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते; ’शोषण’ नव्हे.
अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.
केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.
केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजुबाजूच्या केळी बागायती करणार्या शेतकर्यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.
केरळ मध्ये जेवणासाठी व जेवण पॅकींग साठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..
पण आपण कधी सुधारणा करणार वेळ कुणासाठी थांबत नाही.
संकलन-
उपचार व आहार तज्ञ
डॉ. हुजेफा(सांगली)
संपर्क - 8446674786