logo

मायग्रेन (अर्धशिशी); कारणे आणि लक्षणे मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्भविणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असे म्हटले गेले आहे.

मायग्रेन (अर्धशिशी); कारणे आणि लक्षणे

मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्भविणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असे म्हटले गेले आहे.

◼️ही डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरुपाची असून, कोणत्याही प्रकारच्या आवाजाने, प्रखर उजेडाने किंवा ठराविक वासाने ही आणखीनच बळावते.

◼️मायग्रेनच्या विकारामध्ये डोकेदुखी सोबत क्वचितप्रसंगी डोळ्यासमोर प्रकाशाचे ठिपके येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

◼️मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूमधील नर्व्ह सिग्नल्स मध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते.

◼️मायग्रेनची डोकेदुखी उद्भविण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी, शारीरिक थकवा, अपुरी झोप, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव, काही ठराविक औषधांचे सेवन, किंवा अति प्रमाणात मद्यपान ह्या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

◼️मायग्रेनमुळे होत असणाऱ्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे डोके दुखत राहते.

◼️तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालीमुळे ही डोकेदुखी अजूनच वाढते.

◼️डोके एका बाजूलाच दुखत राहते. आपण असलेल्या ठिकाणी कमीजास्त होत असलेला प्रकाश, किंवा बदलणारे तापमान यामुळेही डोकेदुखी बळावू शकते.

मायग्रेनचा त्रास लहानपणापासून किंवा अगदी तरुण वयामध्ये सुरु होतो.
काही प्रमाणात हा विकार अनुवांशिकही आहे.

◼️तसेच हार्मोन्स मध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलनामुळेदेखील मायग्रेन चा त्रास होऊ शकतो.

पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते.

◼️जेवणाच्या वेळा अनियमित असणे, किंवा जेवणाला एखाद्या वेळी अजिबात फाटा देणे, वारंवार उपवास करणे हीही कारणे असू शकतात.

◼️मोनोसोडियम ग्लूटामेट वापरून बनविलेल्या खाद्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे, किंवा सोडा युक्त खाद्यपदार्थ जास्त खाणे या मुळे ही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

◼️अल्झायमर, एपिलेप्सी किंवा तत्सम नर्व्हस डिसॉर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार पहावयास मिळतो.

तसेच आपण घेत असलेल्या काही औषधांमधील रसायने आपल्या शरीराला मानविणारी नसली तरी मायग्रेन होऊ शकते. उदाहरणार्थ, गर्भप्रतिबंधक औषधांमुळे मायग्रेन उद्भविल्याचे पाहिले गेले आहे. मायग्रेनमुळे डोकेदुखीसोबतच मळमळल्यासारखी भावना होऊ शकते. तसेच डोक्याबरोबर मान दुखणे किंवा मान अवघडणे अश्या तक्रारीही उद्भवू शकतात. अश्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तसेच मायग्रेन मुळे जेवण झाल्यानंतर ही परत परत भूक लागू शकते.

क्वचित प्रसंगी डोकेदुखी इतकी वाढते की ती व्यक्ती संपूर्णपणे गोंधळून जाते, आणि आपण कुठे आहोत याचे भानही त्या व्यक्तीला राहत नाही.

मायग्रेनचे उपचार:-
तुमचे डॉक्टर पेनकिलर देतील.याशिवाय मळमळ आणि उलट्या थांबवण्यासाठी काही औषधे दिली जाऊ शकतात.जर तुम्हाला वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय पेनकिलर घेणे फायदेशीर नाही.तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त वेळा मायग्रेनचा त्रास होत असल्यास, निदान आणि तपासणीसाठी डॉक्टरांकडे जा,आणि योग्य उपचार करा. मायग्रेन डोकेदुखीचे निदान करण्यासाठी MRI किंवा CT स्कॅनसारख्या चाचण्या वापरल्या जाऊ शकतात.

मायग्रेनचे घरगुती उपचार:

आले:-
अर्धेडोके दुखत असल्यास आल्याचे तुकडे चावत राहावे . मायग्रेन डोकेदुखीवर आले चावून खाणे उपयुक्त असून यामुळे डोकेदुखी थांबून मायग्रेनमध्ये होणारी मळमळही कमी होते .

दालचिनी:-
दालचिनी पावडरमध्ये थोडे पाणी घालून पातळ पेस्ट करावी . मायग्रेनमुळे डोके दुखत असल्यास ही पेस्ट आपल्या कपाळाला लावावी . यामुळे मायग्रेन डोकेदुखी थांबण्यास मदत होते .

लवंग:-
मायग्रेन असल्यास काही लवंग तव्यावर गरम करून एका रुमालात गुंडाळून त्या हुंगत राहावे . याशिवाय लवंग बारीक करून त्याची पेस्ट कपाळावर लावल्यानेही मायग्रेन डोकेदुखी कमी होते .अर्धे डोके दुखण्यावर हा आयुर्वेदिक उपाय खूप उपयोगी ठरतो .

देशी गाईचे तूप:-
मायग्रेन डोकेदुखी असल्यास देशी गाईचे तूप 2-2 ड्रॉप्स नाकात घालावे . देशी गाईच्या तुपात कापूर मिसळून त्याचा लेप कपाळावर लावावा .

थंड पाण्याची पट्टी:-
मायग्रेनचा त्रास होऊ लागल्यास ज्या भागात दुखते तेथे थंड पाण्याची पट्टी ठेवा.असे केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल .

जास्त उजेडापासून दूर राहा:-
मायग्रेन डोकेदुखीमध्ये डोळ्यासमोर अंधारी येणे , काजवे चमकने अशी लक्षणे सुरवातीला असतात त्यानंतर डोकेदुखी व मळमळ - उलटी होणे हे त्रास होतात . त्यामुळे मायग्रेन डोकेदुखी सुरू होत असताना डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी वाटल्यास जास्त उजेडाकडे पाहणे टाळावे . स्मार्टफोन , टीव्ही , लॅपटॉप वापरणे थांबवावे . अशावेळी डोळे बंद करून विश्रांती व झोप घ्यावी.

मायग्रेनचा त्रास होऊ नये म्हणून घ्यावी काळजी:–

मायग्रेन डोकेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे , कोणता आहार घ्यावा , काय खावे व काय खाऊ नये याविषयी माहिती खाली दिली आहे .
● संतुलित आहार घ्यावा . आहारात हिरव्या पालेभाज्या , फळभाज्या यांचा समावेश करा .
● ज्यादा वेळ उपाशी राहू नका .
● दिवसभरात किमान 8 से 10 ग्लास पाणी प्यावे.
● मसालेदार पदार्थ , तेलकट - तिखट - खारट पदार्थ , फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे .म्हणजे पित्त वाढविणारे पदार्थ खाऊ नका.
● चहा - कॉफी वारंवार पिणे टाळा.
● पोट साफ राहील याची काळजी घ्या.
● स्मार्टफोन , कॉम्प्युटर , लॅपटॉप , टीव्हीसमोर सतत बसू नका.
● जास्त प्रकाशाच्या उजेडकडे पाहणे टाळावे .
● जागरण करणे टाळा . दररोज किमान 6 ते 7 तासांची झोप आवश्यक असते.पुरेशी झोप घ्यावी.
● नियमित व्यायाम करावा . दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा . मोकळ्या हवेत फिरायला जावे.
● मानसिक ताणतणाव , चिंता यापासून दूर रहा . मनशांत ठेवण्यासाठी योगासने,प्राणायाम , ध्यानधारणा करावी.
● वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
● तंबाखू , गुटखा , सिगरेट , बीडीचे व्यसन करणे टाळा .

● कपिंग थेरेपी करून घ्या, कपिंग थेरेपी मुळे, मायग्रेन चे दुखणे मोठ्या प्रमाणावर पूर्णतः कमी येते. हेड कपिंग मुळे डोक्यात जमलेला दूषित रक्त,मृत पेशी, टॉक्सीन हे निघून जाते व मायग्रेन, डोकेदुखी यापासून सुटका होते. डोक्यावरील हेड कपिंग हे केसांवर होऊ शकते, त्यासाठी केस कमी करण्याची ही गरज भासत नाही.

संकलन-
उपचार व आहार तज्ञ
डॉ. हुजेफा(सांगली)
संपर्क - 8446674786

0
0 views