घसा दुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....
घसा दुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....
सर्दी, खोकला किंवा सायनस मधील इन्फेक्शन हे घसा बसण्याचे कारण असू शकते. जास्त जोरात बोलल्याने किंवा जास्त वेळ बोलत राहिल्याने स्वरयंत्रावर ताण येऊन सुद्धा घसा बसू शकतो. अति थंड किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने सुद्धा घसा बसू शकतो. याशिवाय मोठे आजार म्हणजे थायरॉईड किंवा घशाचा कॅन्सर ही सुद्धा घसा बसण्याची करणं असतात.
कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी घशात ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो.
बहुतेक प्रकरणांमध्ये, घरगुती उपचाराने तुमचा घसा खवखवणे सुधारेल. तथापि, घसा खवखवणे आणि 101 अंशांपेक्षा जास्त ताप एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास आपल्या डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली आहे; तुम्हाला झोपायला त्रास होत आहे कारण तुमचा घसा सुजलेल्या टॉन्सिल्स किंवा एडेनोइड्समुळे ब्लॉक झाला आहे; किंवा लाल पुरळ दिसून येते.
सोपे घरगुती उपाय.....
१) ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल.
२) मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल.
३) लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे.
४) वेलदोडे दाणे व साखर एकत्र चघळावे, हळद व गूळ एकत्र करून खावे.
५) एक पेला भर पाण्यात तिन चार कडुनिंबाची पाने उकळून थंड करून त्यात एक चमचा भरून मध मिसळून याने गुळण्या कराव्यात. लगेच आराम मिळतो.
६) पाण्यात बडिशेप उकळून, गाळून, मग मध मिसळून घ्यावे.
७) मधात काही लवंगा टाकून, मग थोड्या वेळाने हे चाटण घ्यावे, घसा दुखणं थांबेल.
८) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळावा. याने जंतुसंसर्ग जातो.
९) घसा खवखवत असल्यास खडिसाखर व चिमूटभर काथ जिभेवर ठेवून चघळावे, त्याने खुपचं आराम मिळतो.
१०) त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.
११) मध, ज्येष्ठमध पावडर हळद व कोरफड गर एकत्र मिसळून हे चाटण दिवसभर थोडे थोडे घ्यावे.
१२) आंब्याची पाने पाण्यात उकळून मग गुळण्या कराव्यात.
१३) एक कप कोमट पाणी आणि त्यामध्ये काही प्रमाणात मीठ टाकून गुळण्या करा. जेव्हा तुमचा घसा दुखत असेल किंवा खवखवत असेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. मीठ वापरल्याने तुमच्या घशातील ऊतींमधून द्रव बाहेर पडतो, ज्यामुळे विषाणू बाहेर पडण्यास मदत होते.
१५)एक प्रभावी काढा...
एक पेला भर पाण्यात लवंग, ज्येष्ठमध, काळे मिरे, हळद, दालचिनी, केशर, आले, गुळ, हे सर्व पदार्थ एकत्र टाकून अर्धं उकळावे. व गरम गरम, शेकत प्यावे. याने घशाची सूज, वेदना, जंतूसंसर्ग, जातो.
वरील उपाय करावेत. आराम पडेल नक्कीच...
संकलन-
उपचार व आहार तज्ञ
डॉ. हुजेफा(सांगली)
संपर्क - 8446674786