logo

हरित महाकुंभ प्रयागराजसाठी नांदेड येथून 9500 स्टील थाली व 10000 कापडी पिशवी रवाना

प्लास्टिक प्रदूषण मुक्तीसाठी पर्यावरण सरंक्षण गतिविधीचे समितीचे पाऊल...

नांदेड, दि. २० ः हरित महाकुंभ प्रयागराज साठी नांदेड येथून 9500 स्टील थाली व 10000 कापडी पिशवी पाठवण्यात आल्याची माहिती पर्यावरण संरक्षण गतिविधी समितीच्या वतीने देण्यात आली.

पर्यावरण सरंक्षण गतिविधी मार्फत भारतात महाकुंभमध्ये प्लास्टिक प्रदूषण कमी व्हावं यासाठी स्टील थाली व कापडी पिशवी अभियान राबविण्यात आले. नांदेड येथून 30 संकलन केंद्रात 9500 थाली व कापडी पिशवी भाविका मार्फत गोळा करून दत्तजयंती दिनी विधिवत पूजा करून ट्रकने पाठविण्यात आले. गजानन महाराज मंदिर तरोडा नांदेड येथे स्वामी चिन्मय बालाजी मंदिर स्वामी प्रत्यानंदजी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

महाकुंभ 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 प्रयागराज येथे होत आहे. 45 कोटी भाविक या कुंभास भेट देणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था साठी स्टील थाली केल्यामुळे करोडा प्लास्टिक थाली मुळे होणार प्रदूषण थांबणार आहे. स्टील थाली प्रयागराज येथील भंडाऱ्यात वापरण्यात येणार आहेत, विविध आखाड्या मार्फत 10000 भंडाऱ्याच आयोजन करण्यात आले. संपूर्ण भारतात लाखो स्टील थाली, कापडी पिशवी संकलन झाले असून हे महाकुंभ प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

पर्यावरण गतिविधी नांदेड विभाग संयोजक दीपक मोरताळे, सनत महाजन, डॉ राजेंद्र पाटील, चंदा काबरा, धनंजय नलबलवार, संदीप कऱ्हाळे, संतोष परळीकर, अरुण पोपळे, राजेंद्र देवणीकर, एकनाथ घुले, दीपा तोष्णीवाल, रुचि राठी, निशा अग्रवाल, उषा शर्मा, विमल चक्करवार, पूजा मोदी, कल्पना राठी, कल्पना चौधरी, किरण अग्रवाल, शांता काबरा, चौधरी, पांडे, ठाकूर व असंख्य भक्त उपस्थित होते.

0
471 views