logo

त्यांनी म्हटले आंबेडकर आंबेडकर आंबेडकर बोलण्याची फॅशन झाली आहे एवढे वेळेत ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग भेटला असता.... दुसरीकडे विरोधक बाबासाहेब हे आमचे भगवान आहेत म्हणून बाबासाहेब यांना ईश्वराचा दर्जा देवू लागले....

त्यांनी म्हटले आंबेडकर आंबेडकर आंबेडकर बोलण्याची फॅशन झाली आहे एवढे वेळेत ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग भेटला असता....
दुसरीकडे विरोधक बाबासाहेब हे आमचे भगवान आहेत म्हणून बाबासाहेब यांना ईश्वराचा दर्जा देवू लागले....
यातून काय समजले ! मी बाबासाहेबांच्या विचारांचा केवळ भावनिक होवून स्वीकारत नाही तर बुद्धाने घालून दिलेल्या बुद्धी स्वातंत्र्याचा विचार करून च करतो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचे शब्द समजून घेताना बुद्धीच्या कसोटी वर पारखून निश्चित घेतो. यामुळे बाबासाहेबांचे अनेक शब्द समोरच्याला वाटतात एक परंतु त्यामागचा हेतू काही वेगळाच असतो. जसे क्रांती प्रतिक्रांती , अस्पृश्य मूळचे कोण ? आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म ही तीन पुस्तके वाचानाऱ्याला वाटतात एक परंतु त्यांच्यामागे हेतू मात्र वेगळा आहे. जाहीर करण्याची निश्चित गोष्ट नाही कारण आपल्याला ही काही गोष्टी चार भिंतीत सांगण्याची आहे कारण शत्रू बहुसंख्य आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
आता येवू या या लोकांच्या वक्तव्यावर आणि त्यांच्या कृतिवर हे नेहमीच असे ट्रॅप टाकतात आणि आपल्याला प्रतिक्रियावादी करून ठेवतात आणि ह्यांचे मात्र सदस्यता अभियान राबवून जास्तीत जास्त लोक जोडून आपले संघटन मजबूत करतात. नुकतेच परभणीचे प्रकरण पाहिलेत तर त्यातून तुम्ही किती असंघटित आहात याचे उत्तम उदाहरण त्यांनी तुम्हाला दाखवून दिले. ते असे का करतात कारण ते वेळोवेळी पाहतात की हे लोक संघटित तर नाही ना झाले आणि ते तपासण्यासाठी च असा प्लॅन असतो. आपण किती संघटित आहोत हे परभणी मध्ये पाहायला मिळाले यात एक गोष्ट इथे प्रत्येकाला मी समाजासाठी काही तरी करतो म्हणून एक एक नेता बनू लागलाय मग असे अनेक लोक आहेत त्यांना वाटत असेल की , मी समाजासाठी काम करतोय पण त्यांनी आपल्या मनाला प्रश्न विचारले पाहिजेत की खरंच यामुळे माझ्या समाजाचा माझ्या समाजाची ही संघटित असल्याचे लक्षणे आहेत का ? ज्या लोकांचे संघटन कमजोर जे असंघटित आहेत तो पर्यंत त्यांच्यासाठी निश्चित राहण्याचे दिवस असतात.
आमच्याकडे सदस्यता अभियान नसते आमच्याकडे थेट राष्ट्रीय अध्यक्ष 30 40 लोक घेवून राष्ट्रीय संघटन काही जणांचे राज्य स्तरीय संघटन असे करून एवढे विभागले आहोत की त्यांना एकत्र करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली म्हणून समजा. म्हणून संघटन एक असावे आणि राष्ट्रीय स्तरावर असावे. एखादे प्रकरण झाले तर अनेक नेत्यांचे नाही तर सूत्रबद्ध संघटनेचे पदाधिकारी दिसले पाहिजेत. नेते बनून फक्त चार लोक चांगले म्हणतील पण इतिहास मात्र तुम्हाला विसरून जाईल. म्हणून इतिहास घडवा तो गरजेचं आहे.
त्यांच्या षडयंत्राला बळी पडून आपन असंघटित आहोत हे दाखवत आलोय त्यामुळे समाजातील तरुणांनी विचार करा कुणाच्या तरी मागे फिरून आयुष्य घालवायचे की राष्ट्रीय स्तरावर एक सक्षम संघटन उभे करून बाबासाहेबांचे कार्य पुढे न्यायचे.
विचार तुम्ही करा कारण तुमच्या विकासाचा अंतिम मार्ग हा धम्म च आहे बुद्धाची शिकवण च आहे ज्या मार्गावर बाबासाहेबांनी नेले आहे त्या मार्गापासून दूर जावून काही. ही एक उपयोग नाही.
-मिलिंद खडसे


4
1347 views