logo

*लोकनियुक्त सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत यांनी बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये बालसाखरपुडा आणि कमी वयाचे बोलमागणे न करण्याचा ठराव मंजूर .*

विश्वनाथ भोये
जव्हार ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी बाल विवाह होत असतात आणि कमी वयात लग्न झाल्यामुळे जन्माला येणारे बाळ हे कमी वजनाचे असते त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण ही वाढते आणि बऱ्याच वेळेस माता चे वय कमी असल्यामुळे माता आणि बाळ दगविण्याची दाट शक्यता असते आणि अश्या बऱ्याच घटना ह्या ग्रामीण भागात घडतात आणि त्यामुळे आता सरकारे बालविवाह रोखण्यासाठी खास मोहीम राबवून ग्रामपंचायत स्तरावर विशेष असे लक्ष देऊन सरपंच , ग्रामसेवक, सदस्य , आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या प्रयत्नातून त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे आव्हान केले आहे.त्यामुळे नेहमी बहु चर्चित असलेली ग्रामपंचायत कासटवाडीने अशा एक ठराव केला की बालविवाह रोखायचा असेल तर बालसाखरपुडा करण्यास रोखल पाहिजे आणि याठी सर्व पेसाग्रामसभा आणि ग्रामपंचायत ग्रामसभे मध्ये ठराव करण्यात आला असून यावेळी, कासटवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. कल्पेश विनायक राऊत, उपसरपंच श्री. त्रिंबक रावते, ग्रामविकास अधिकारी श्री. किशोर सोनवणे, ग्राम सदस्य, कुणाल रावते, नितीन चौधरी, नितीन टोकरे, शंकर इल्हात, अशोक इंधन, कल्याणी राऊत, सुलोचना चौधरी, सुचिता होळकर, राजश्री टोकरे , तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामस्थ उपस्थित होते

0
17 views