logo

नरबळी पूर्वतयारीसाठी घरात खोल खड्डा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार : पाचजणांना अटक; पोलिस कोठडी

नरबळी पूर्वतयारीसाठी घरात खोल खड्डा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार : पाचजणांना अटक; पोलिस कोठडी
कुडाळ तालुक्यातील हिर्लोक- आंबेडकरवाडी येथील अघोरी कृत्याप्रकरणी विशाल विजय जाधव, सुमित मिलिंद गमरे, सौ. हर्षाली विशाल जाधव, अविनाश मुकुंद संते, दिनेश बालाराम पाटील या पाच संशयितांना अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाचही संशयितांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
१७ डिसेंबर रोजी आवळेगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच विशाल जाधव याच्या राहत्या घरात छापा टाकला. विशाल जाधव याच्या घरात सुमारे ४ बाय ४ फूट लांब व ८ फूट खोलीचा खड्डा खोदलेला दिसून आला. तसेच अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करणारे साहित्य लिंबू, पान-
नरबळी व पैशाच्या
पावसाचा प्रकार?
आजची ही घटना नरबळीसह पैशाचा पाऊस पाडणारी होती, असे संशयितांच्या नातेवाइकांच्या बोलण्यातून स्थानिकांना समजले; पोलिसपाटील व गावातील प्रमुख मंडळीचेसुद्धा हेच म्हणणे आहे.
सुपारीचे विडे, हळद, कुंकू, नारळ, फळे, फुले, तीळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरू, रुद्राक्ष माळ, चांबड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोट्या काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहित्याची मांडणी करून अघोरी कृत्याकरिता कोयता व सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली.

7
3251 views