logo

महिलांना आर्थिक सक्षम बनविनारा खाद्य महोत्सव ग्रामस्थांच्या उस्फूर्थ प्रतिसादात संपन्न वडणगे कोल्हापूर येथे

महिलांना आर्थिक सक्षम बनविनारा खाद्य महोत्सव ग्रामस्थांच्या उस्फूर्थ प्रतिसादात संपन्न
बी एच दादा प्रेमी युवक मंचचा सलग दहाव्या वर्षी अखंडीत उपक्रम
मंचच्या नेटक्या नियोजनाने अवघ्या तीन तासात लाखो रुपयांची उलाढाल
बी एच दादा प्रेमी युवक मंचच्या वतीने युवा नेते श्री रविंद्र बळीराम पाटील यांच्या उपक्रमशील वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सलग दहाव्या वर्षीच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या संपन्न बनविणाऱ्या खाद्य महोत्सवामध्ये ग्रामस्थांच्या उस्फूर्थ प्रतिसादाने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
सदरच्या खाद्यमहोत्सामध्ये सुमारे 120 स्टॉल लावण्यात आले होते महिलांसाठी खास हे सर्व स्टॉल मोफत देण्यात आले होते
महिला सक्षमीकरण तसेच महिलांना आर्थिक गुंतवणूक व नफा हे अर्थांजन समजण्यासाठी तसेच महिलांनी धाडसाने पुढे येऊन व्यवसाय करावा यासाठी हा उपक्रम सातत्याने मंचच्या वतीने घेतला जातो.
शाकाहारी तसेच मांसाहारी शेकडो नाविण्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद वडणगे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे घेत मोठ्या गर्दीने हा खाद्यमहोत्सव साजरा झाला.
माजी जी प सदस्य बी एच पाटील दादा यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच सर्व स्टॉलधारकांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली.
सदरच्या खाद्य महोत्सवाला श्री बी एच पाटील दादा युवा नेते रविंद्र पाटील के एस पाटील सोसायटी चेअरमण उत्तम देवणे माजी सरपंच सचिन चौगले माणिक जाधव सुनील माने नेताजी चौगले दिनकर पाटील संजय पाटील शिवाजी पाटील आनंदराव पाटील प्रवीण चौगले ऋषिकेश ठाणेकर माणिक जाधव मुन्वर मुल्ला शंकर व्हरणे सलिम मुल्ला दिग्वीजय खडके रवि मोरे राहूल जाधव पिंदू पिलके कुणाल शेलार उत्तम खुदाळे सनी जौदाळ युवराज साळोखे सतिश चेचर आर बी देवणे सर उपस्थित होते.

5
5996 views