गुंडांच्या दहशतीने जगणे मुश्किल; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी...
अहिल्यागर अपडेट
📄शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत पसरविणाऱ्या गुंडासह त्याच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले आहे.
👥 *यांची उपस्थिती*
यावेळी दलित महासंघाचे सुनील उमाप, सागर साठे, प्रकाश वाघमारे, विकास उडानशिवे, पप्पू पाटील, सतीश साळवे, सुरेश वैरागर, रवी साठे, विशाल उल्हारे, भास्कर जाधव, संजय परदेशी, बंटी साबळे, राकेश राजपूत, गणेश ससाणे, पप्पू पाथरे, सोमनाथ अडागळे, राहुल मंडलिक, अमोल लोखंडे, विशाल कांबळे, कांता खुडे, मोना गाडे, अलका साबळे, मंगल चांदणे, अनिता चांदणे, अंजली शेलार, वैशाली साबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 *गुन्हा दाखल*
रामवाडी झोपडपट्टीत रविवारी ता. १५ रोजी वाहनांची तोडफोड करुन दांडके व तलवारीने मारहाण केल्याप्रकरणी जाधवसह पाच जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी कायम रामवाडीत दमदाटी करुन दशहत निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
श्री. राधाकिसन क्षीरसागर
राज्य प्रतिनिधी,
ऑल इंडिया मीडिया असोसिएशन,
महाराष्ट्र.