logo

मोटारसायकल-एसटी अपघातात तरुणाचा मृत्यू ...

मुरुड हद्दीतील निसर्ग हॉटेलजवळच्या रस्त्यावर शनिवारी (दि.14) सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड एसटी बस डेपोतून रेवदंडामार्गे महाड बस सकाळी 8 वाजता निघाली होती.
अरमान सलीम दखनी (18) असे घटनेतील मृत दुचाकीस्वाराचे नाव असून तो मुरुड नादगांव मोहल्ला येथील रहिवासी होता. या घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी एसटीचालक अविनाश दिघे यांच्याविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

0
84 views