महात्मा फुले महाविद्यालयामध्ये नॅक डॉक्युमेंटेशन अँड न्यू रिफॉर्म २०२४ वरती कार्यशाळा संपन्न
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा सलग्नित वरुड येथील महात्मा फुले महाविद्यालयांमध्ये नुकतेच नॅक डॉक्युमेंटेशन अँड न्यु रिफॉर्म २०२४ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालय २०२६ मध्ये नॅकला समोर जाणार आहे त्या दृष्टीने सदर महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. हांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डब्ल्यू. एस. बर्डे माजी आयक्यूएसी समन्वयक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती तसेच प्रा. एच. एस. लुंगे माजी आयक्यूएसी समन्वयक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती हे होते. दोन्ही वक्त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या मार्फत महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबोधित करत नॅकला समोर जात असताना आपल्या फाइल्स आपले कागदपत्रे यांचे नीट व्यवस्थापन कसे करावे हे समजून सांगितले तसेच नॅकद्वारे पुढे बायनरी सिस्टीम द्वारे एक्रेडेशन होणार असून त्यांची रूपरेषा कशी राहू शकते याबद्दल सादरीकरण केले. सदर कार्यक्रमानंतर दोन्ही वक्त्यांनी महाविद्यालयातील संपूर्ण विभागांना भेटी देत कागदपत्रांची पडताळणी केली तसेच काही महत्त्वपूर्ण सूचनांचा पुरवठा विभाग प्रमुखांना केला. सदर कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही.हांडे यांनी मार्गदर्शन करत महाविद्यालयाचे पुढील दोन वर्षाचे मिशन काय असायला हवेत तसेच आपल्या महाविद्यालयाला 'ए' श्रेणीमध्ये कसे आणायचे आहे याबद्दल कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आयक्यूएसी समन्वयक डॉ. एस. व्ही. सातपुते यांनी केले तसेच सदर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ. जी.के. रेड्डी यांनी कामकाज पाहिले या कार्यशाळेचा येणाऱ्या दोन वर्षांमध्ये नॅकच्या दृष्टीने नक्कीच महाविद्यालयाला फायदा होईल असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सदर कार्यशाळेला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, कंत्राटी शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे आभार महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. सी. डी. पाखरे यांनी मानले.