logo

ईव्हीएम हटवण्यासाठी दिव्यातील नागरिकांना वंचितची साथ

श्री.गोपाळ राजभर ( उपसंपादक ) दिवा: वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हटवण्यासाठी जोरदार जनआंदोलन सुरू केले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार आयु. विकास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत प्रमोद कांबे, गणेश पवार, सुनील जाधव, नितीन अहिरे, नितीन जाधव, देवेंद्र कांबळे, राकेश शिंदे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे.
मोहीमेमध्ये स्थानिक नागरिकांच्या सह्या संकलित करून पारंपरिक मतपत्रिकाद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. ईव्हीएममुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन हाती घेतले आहे.

1
4099 views