स्कुल बस आणि मोटरसायकल चा भीषण अपघात मोटारसायकलस्वाराचा !मृत्यू
आयमा न्युज बुलडाणा
वसीम शेख
येळगावच्या आश्रमशाळेजवळ झाला अपघात
बुलढाणा, ११ डिसेंबर सकाळी ९ वाजे दरम्यान जळगाव आश्रम शाळेजवळ चिखली बुलढाणा रस्त्यावर स्कूल बस आणि मोटरसायकल यांच्यामध्ये टक्कर झाली. मोटर सायकलस्वार युवक या भीषण अपघातात जागीच ठार झाला. मृतक युवकाचे नाव जीवन इंगळे असून तो खूपगावचा राहणार असल्याचे कळते. हा अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल चकनाचूर झाली. स्कूल बस (एमएच २८ बीबी २२३३) शिवसाई ज्ञानपीठ सागवनची आहे.