
साने गुरुजी विद्यालयामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ५२ सायकलींचे वाटप.
साने गुरुजी विद्यालय बोर्ली ता. मुरुड (जंजिरा), जि. रायगड येथे श्री हितेन रमणलाल माहीमतुरा यांच्या पुढाकाराने सायकल वाटपाचा कार्यक्रम सोमवार दिनांक 09/12/2024 रोजी संपन्न झाला.कॅमेरा रेबेको आणि इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे पीयर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण चोगले यांच्या विशेष प्रयत्नातून सदर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या वेळी कॅमेरा रेबेको च्या सन्माननीय हेड उपासना साबो मॅडम इनर विल क्लब ऑफ बॉम्बे पियर यांच्या प्रेसिडेंट सन्माननीय निश्चिन श्यम्स मॅडम ,मारिया लोखंडवाला ,मुनिरा खट्टवाला व तसेच साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार अमोल देहेरकर सर, सचिव श्री सुनील पाटील, आणि उपाध्यक्ष जितेंद्र नाक्ती बोरली केंद्राच्या केंद्रप्रमुख मॅडम सौ सुविधा पाटील मॅडम तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रसंगी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण चोगले सर यांनी गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात सायकल मिळाल्यामुळे वरील सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.