
इंटरनॅशनल बॉडी बिल्डर राजस्थानची पहिली महिला बॉडी बिल्डर प्रिया सिंग मेगवाल यांनी सुवर्णपदक जिंकून देशाचं नाव उंचावले
थायलंड येथे झालेल्या 39 व्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत राजस्थानची पहिली महिला बॉडी बिल्डर प्रिया सिंग मेघवाल हिने सुवर्णपदक जिंकून राजस्थान आणि देशाचे नाव उंचावले आहे. बॉडीबिल्डर प्रिया सिंगला बुरखा (डोक्यावर पदर) ते बिकिनीपर्यंतच्या प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. प्रिया सिंहने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मी ज्या संस्कृतीत राहते, तिथे मला साडी आणि डोक्यावर पदर घेऊन परंपरा पाळावी लागते, पण माझ्या खेळात अनेकांनी मला टोमणे मारले. मी जिथून आली आहे तिथे महिला डोक्यावर पदर घेऊन जन्माला येतात आणि डोक्यावर पदर घेऊनच मरतात. पण मी परंपरांचे पालन करण्याबरोबरच निशाणा साधला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या प्रिया सिंगला तिचे स्वप्न साकार करण्यासोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेत असूनही ती देशासाठी सुवर्णपदक मिळवते प्रिया सिंगला अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. दोन मुलांची आई प्रिया सिंहने सांगितले की, आज ती ज्या स्थानावर आहे ती तिच्या मुलीमुळेच आहे.
मुलीला जेवणापासून कपड्यांपर्यंत सर्व काही करायला लागले त्यामुळे माझा प्रवास सुखकर झाला. बॉडी बिल्डर प्रिया सिंहने महिलांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, त्यांनी इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचे भविष्य घडवावे. मुलांच्या नावापुढे बापाचं नाव लागतं... पण महिलांनी असे काही करावे जेणेकरून आईचे सुद्धा सुद्धा जगभर गाजलं पाहिजे. खरच सलाम या नारीशक्तीला.
सचिन एटम......