
शारीरिक व्यंगाला न जुमानता
रक्तदाते,आयकॉन
शारीरिक व्यंगाला न जुमानता
रक्तदाते,आयकॉन
*मुकुंद गोसावी यांचे मतदान व रक्तदान*
जळगाव :(शाह एजाज़ गुलाब)
आपल्याकरिता सारेच जगतात परंतु इतरांसाठी जगण्यात मोठा आनंद असतो, सामाजिक, आरोग्य,रक्तदान क्षेत्रात अव्याहत कार्यरत असलेले मुकुंद गोसावी यांना पोलिओ आजारामुळे बालपणापासून पायाला शारीरिक व्यंग असूनही आपल्याजवळ जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान माणून इतरांसाठी काही चांगले करता येईल का या हेतूने आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमामता ,धडपडी अष्टपैलू व्यक्तिमत्व विक्रमी रक्तदाते, जिल्हा (निवडणूक विभाग) प्रशासनाने नियुक्त केलेले मतदान जनजागृतीचे आयकॉन मुकुंद गोसावी यांनी यंदाच्या 2024 विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत स्वयंस्फूर्त मतदान करून रक्तदान करत सुदृढ समाजासमोर अनोखा विक्रम केला आहे.
सक्षम राष्ट्राकरिता मतदान अतिशय आवश्यक असून, पीडित - गंभीर रुग्णांसाठी जीवनदाना करिता रक्तदान गरजेचं आहे. सध्या हिवाळा चालू असतानाही सर्वच रक्तपेढ्यांमध्ये सुरळीत रक्तपुरवठ्याला अडचण येत असून गंभीर रुग्णांसाठी ते धोकादायक असल्याने 18 वर्षावरील 50 किलो वजन असलेले कोणीही निरोगी व्यक्ती सहज स्वेच्छेने रक्तदान करू शकतात. आपल्या शरीरात जवळपास पाच ते सहा लिटर रक्त असतं तर एका रक्तदाना वेळी (फक्त तीनशे पन्नास एमएल) पाव लिटर रक्त आपण दान करतो , अशा या रक्तदानामुळे कुठल्याही प्रकारची शारीरिक कमजोरी किंवा व्याधी उत्पन्न होत नाही तर अतिशय उत्साहवर्धक आनंदी वाटतं, रक्तदानामुळे शरीर निरोगी राहत, आपल्या अमूल्य वेळेत पाच मिनिटं वेळ काढून साधारण वर्षातून चार वेळा आपण सहज स्वेच्छेने रक्तदान करू शकतात, दिलेले रक्त काही वेळेतच भरून निघते.आपल्या एका रक्तदानातून अनेक प्रकारचे घटक तयार होतात. आपल्या एका रक्तदानाने एका वेळी अनेकांना जीवनदान मिळते, त्यातच आज आधुनिक प्रणालीमुळे आपल्या पिडीत गंभीर रुग्णांना रक्त घेताना जर नेट तपासणी युक्त रक्त घेतल्यास ते पूर्णतः व्याधीमुक्त असते.