जिल्ह्यातील समर्थकांच्या भावना देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पोहोचविल्या - आमदार बबनराव लोणीकर.
परतुर येथे लोणीकर समर्थकांचा आभार मेळावा संपन्न - हजारो समर्थकांकडून लोणीकरांचं भव्य जंगी स्वागत
जिल्ह्यातील समर्थकांच्या भावना देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पोहोचविल्या - आमदार बबनराव लोणीकर
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकरिता मला मंत्रिमंडळात नक्कीच संधी मिळेल - आमदार बबनराव लोणीकर
महाविकास आघाडी सत्तेत असताना अराजकता माजली होती साधू संतांवर हल्ले होत होते - आमदार बबनराव लोणीकर
तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्रात एक कोटी स्वच्छतागृह बांधकाम करून महाराष्ट्र राज्याला हागणदारी मुक्त केल.
तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यभरात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना यशस्वीपणे राबवली.
परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वलस्थानी नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांचा दावा
परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदार संघात विजेच आणी उत्कृष्ट रस्त्याच जाळ निर्माण केल - आमदार बबनराव लोणीकर
तत्कालीन मंत्री पदाच्या काळात चार हजार कोटी रुपये निधी ची परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदार संघात विकास कामे
2019 ते 2024 या पाच वर्षात केंद्र व राज्य सरकार च्या माध्यमातून 3700कोटी रुपये निधी मंजूर करून आणला.
परतूर (प्रतिनिधी):-
भाऊसाहेब पाटील मुके -
शरद पवार यांच्या नेतृत्वातील उबाठा गटाचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील महाविकास आघाडी सत्तेत असताना राज्यभरात अराजकता माजली होती. साधू संतांवर हल्ले होत होते. राष्ट्रीय पुरुषांवर महाविकास आघाडीतील दळभद्री नेते तोंड सुख घेत होते. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तत्कालीन राज्याचे गृहमंत्री महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करत होते. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला उलथवून पायाखाली घेण्याच धाडस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवल त्यांच्या पाठीशी राज्यातील भारतीय जनता पक्ष खंबीरपणाने उभा राहिला. त्यामुळे राज्याच्या राजकीय सत्तेत तडजोड करावी लागली होती. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाची विद्यमान नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. ते भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित परतूर - मंठा - नेर - सेवली विधानसभा मतदार संघातील परतूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्ष महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भव्य मेळाव्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत असताना बोलत होते. यावेळी पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की महाराष्ट्रात पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची मंत्री पदाची जबाबदारी माझ्यावर असताना आपण परतूर विधानसभा मतदारसंघात सुमारे 4000 कोटी रुपये निधी विकास कामाकरता आणला असून गत पाच वर्षात विधानसभेचा सदस्य म्हणून काम करत असताना परतुर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण 3700 कोटी रुपये निधी आणला असून परतूर विधानसभा मतदारसंघ राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत विकासात अव्वल स्थानी असून मी केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरच आपण विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांना सामोरे गेल. विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी विकास कामांना प्राधान्य देऊन मला पुन्हा पाचव्यांदा विधानसभेत मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून दिली याबद्दल विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य मतदार बंधू-भगिनींचा मी मनःपूर्वक आभारी आहे. पुढे बोलताना माजी मंत्री नवनिर्वाचित आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मतदार संघातील समर्थकांच्या भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचविले आहेत. तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पदाच्या खात्याचा कारभार माझ्याकडे असताना महाराष्ट्र राज्यात आपण एक कोटी स्वच्छतागृह बांधकाम करण्याकरिता प्रती लाभार्थी 12 हजार रुपये अनुदान देऊन महाराष्ट्र राज्याला हागणदारीमुक्त केला आहे. गावागावातील तांडेवाड्या वस्ती आतील खेड्यापाड्यातील नागरिकांसह शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावं म्हणून राज्यातील 18000 गावात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आपण यशस्वीपणे राबविले असून. हागणदारी मुक्त महाराष्ट्र आणि पिण्याचे शुद्ध पाणी राज्याला पुरविल्यामुळे महाराष्ट्रातील रोगराई नाहीशी झाली असून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुधारलं असून साथीचे आजार आता उद्भवत नाहीत असा दावाही यावेळी आमदार लोणीकर यांनी केला. तत्कालीन मंत्रीपदाच्या कार्यकाळात खांद्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवून केलेल्या कामामुळे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळेल असा विश्वास देखील यावेळी आमदार लोणीकर यांनी आपल्या समर्थकांसमोर बोलताना व्यक्त केला.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुलभैया लोणीकर,
भाजपा तालुकाध्यक्ष शत्रगुण कणसे, रमेश राव भापकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संपतराव टकले, भगवानराव मोरे दया काटे, महाराज, संभाजी वारे, नगरसेवक प्रवीण सातोनकर, कृष्णा आरगडे, निवृत्तीआप्पा लाटे, आसाराम लाटे. माणिकराव वाघमारे, बबनराव आकात, प्रकाश चव्हाण, संदीप बाहेकर अशोकराव बुरकुले, बंडू मानवतकर, तुकाराम सोळंके, बद्रीभाऊ ढवळे, गजानन लोणीकर, बबलू सातपुते, नितीन जोगदंड, दिनेश होलानी, स्वप्नील मंत्री यांच्या सह हजारो कार्यकर्ते समर्थकांची उपस्थिती होती.