logo

व्हाईट पेपर या नाटकाचे उत्तम सादरीकरन

नांदेड – स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था, नांदेडच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर रोजी इरफान मुजावर लिखित, दिनेश कवडे दिग्दर्शित “व्हाईट पेपर” या नाटकाचे उत्तम सादरीकरन झाले.
63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीत रसिक प्रेक्षकाना एक उत्तम सांघिक परिणाम दर्शविणारे व्हाईट पेपर या नाटकाने मंत्रमुग्ध केले. एक गाव आणि त्या गावातील एक ऐतिहासिक ठिकाण ज्याचे नव्याने इतिहास लिहिण्याची जबाबदारी गावकर्यांवर पडते आणि प्रत्येक व्यक्ती हि जागा आप आपल्या धर्माशी कशी निगडीत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि गावातील सलोख्याचे वातावर दुषित होण्यास सुरवात होते. आणि यातच हे नाटक घडत जाते. या नाटकाचे दिग्दर्शक दिनेश कवडे यांची दृश्य बांधणी नाटकाला खेळते ठेवते. एकाच वेळी तब्बल पंधरा कलावंतानाचा रंगमंचावरील वावर अतिशय उत्कृष्ट पणे दिग्दर्शकाने हाताळले. या नाटकातील अक्षय राठोड यांनी साकारलेली सरपंचाची भूमिका, श्याम डुकरे यांनी साकारलेली कांबळेची भूमिका आणि गौतम गायकवाड यांनी साकारलेली चाचाची भूमिका लक्षवेधी ठरली . ऐश्वर्य हैबतकर यांनी साकारलेल्या संताजीची भूमिका सभागृहात हास्याची लखेर उमटवते.यातील सुधांशू सामलेट्टी, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अजय पाटील, संदेश राउत, प्राजक्ता बोचकरी, सपना वाघमारे, मंजिरी वायकर पाटील, मोहिनी मोरे, अथर्व देसाई, शिवरुद्र सातपुते या सर्वच कलावंतानी सरस अभिनय करत आप आपल्या पात्रांना योग्य न्याय दिला.
या नाटकाची अनिखी एक जमेची बाजू म्हणजे किरण टाकळे, पूजा तरकंटे आणि गौतम गायकवाड यांनी साकारलेले वास्तववादि नैपथ्य, श्याम चव्हाण आणि कैलास पोपुलवाड यांनी आशयानुरूप प्रकाशयोजना साकारली तर संगीत संयोजन सुदाम केंद्रे, रंगभूषा, वैशभूषा शांती देसाई आणि रंगमंच सहाय्य चक्रधर खानसोळे यांनी सांभाळले.
हे नाट्य प्रयोग पाहण्यासाठी शहरातील अनेक प्रतिष्टी नागरिकांनी गर्दी करत कलावंताना प्रोत्साहन दिले. स्पर्धेच्या दुसर्या दिवशी एक आगळा वेगळा नाट्य प्रयोग अनुभवता आल्याचे समाधान रसिक प्रेक्षक व्यक्त करत होते.

138
29205 views